Share News

चेतना तिडके यांची नागपूरला बदली; अमली पदार्थ विरोधी अभियानाची जबाबदारी
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाईच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अपर पोलीस अधीक्षकपदाची धुरा आता अनमोल मित्तल (आयपीएस) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी ठाणे ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मित्तल यांची अंबाजोगाई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. नागपूर येथे त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या प्रशासकीय फेरबदलामुळे अंबाजोगाई पोलीस प्रशासनाची जबाबदारी आता अनमोल मित्तल यांच्याकडे येणार असून, त्यांच्या नियुक्तीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
#NewsLokman #IPS #PoliceTransfer #BeedPolice #Ambajogai #बीड #अंबाजोगाई #पोलीसप्रशासन

About The Author