अंबाजोगाई | प्रतिनिधी
समाजाच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थितीने नवकेशर नवरात्र दांडिया उत्सव २०२६ च्या चौथ्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या मंगलमय सोहळ्यात देवीच्या आरतीचा मान अंबाजोगाई शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना लाभला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित डॉक्टरांची उपस्थिती लाभली. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या उपस्थितीने उत्सवाच्या आनंदात भर पडली.
या सोहळ्यास डॉ. शुभदा लोहिया, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार सर, डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. अतुल शिंदे, डॉ. उद्धव शिंदे, डॉ. योगेश मुळे, डॉ. सुधीर धर्मपात्रे, डॉ. निलेश तोष्णीवाल, डॉ. अतुल देशपांडे आणि डॉ. धर्मपात्रे मॅडम यांची उपस्थिती लाभली.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान समाजासाठी अनमोल आहे. रुग्णांना नवजीवन देण्यापासून ते समाजात आरोग्याविषयी जनजागृती करण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती नवरात्रोत्सवाच्या धार्मिक आणि सामाजिक महत्त्वात भर घालणारी ठरली.
नवरात्रोत्सव हा केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नसून सामाजिक एकोपा, परस्पर सन्मान आणि आपुलकी जपण्याचा आनंदसोहळाही आहे. नवकेशर नवरात्र दांडिया उत्सवाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येत असून, ही बाब अंबाजोगाईच्या सांस्कृतिक वैभवाला नवी उंची देणारी आहे.
नवकेशर नवरात्र दांडिया उत्सवाच्या आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष अभिनंदन आणि कृतज्ञतापूर्वक आभार!





