*भिमशक्ती संघटनेच्या बीड जिल्हा संघटकपदी जीवन घाडगे यांची नियुक्ती*
*_जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांची माहिती_*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी संघटना म्हणून भिमशक्तीची सर्वदूर ओळख आहे. भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्तीचे बीड जिल्हाध्यक्ष अमरेंद्र विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली भिमशक्तीच्या बीड जिल्हा संघटकपदी जीवन दत्तू घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांनी दिली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी जीवन घाडगे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. घाडगे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, धार्मिक व दलित चळवळी मध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांचे आंबेडकरी चळवळी मध्ये ही चांगले योगदान आहे. घाडगे हे बांधिलकी जोपासत गोरगरीब, गरजू लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहेत अशा जीवन घाडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली व भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव मोहनराव माने, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत बनसोडे भिमशक्ती मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्यागर, भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांनी रितसर नियुक्तीपत्र देवून भिमशक्तीच्या बीड जिल्हा संघटकपदी जीवन घाडगे यांची निवड झाल्याचे जाहीर केले आहे. यावेळी नियुक्तीचे पत्र देताना बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष सुमित आवाडे, शहराध्यक्ष संकेत तरकसे, विनोद धिमधिमे, सिद्धार्थ धिमधीमे, प्रवीण धिमधीमे, शुभम तरकसे आदींसह भिमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*भिमशक्तीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :*
खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली मी मागील काही महिन्यांपासून संघटना विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. बीड जिल्ह्यात भिमशक्तीची संघटनात्मक बांधणी केली. ज्येष्ठ, अनुभवी, विविध क्षेत्रात कार्यरत नवनविन कार्यकर्ते, युवक आणि तरूणांना संघटनेशी जोडण्याचे काम करीत आहोत, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील युवक आणि अनुभवी व्यक्तींना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या जात आहेत. भविष्यात ही भिमशक्तीची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करून, संघटनेच्या सर्व आजी – माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भिमशक्तीच्या माध्यमातून चळवळीला बळ, हंडोरे साहेबांना ताकद व युवकांना संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
