पंचायत समितीत वेळेत हजर नसलेल्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर कधी कारवाई होणार …….लोक जनशक्ती पार्टी
अंबाजोगाई :
……………. महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार करून आठवड्यात फक्त पाच दिवस कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये शनिवार व रविवार अशा दोन सुट्ट्या देण्यात आले आहेत तरीसुद्धा आंबेजोगाई पंचायत समितीचे अधिकारी हे वेळेवर कार्यालयात येत नाही विशेषता शासनाच्या नियमावलीनुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 30 असा शासकीय कर्मचारी तथा अधिकाऱ्यांचा कार्यालयीन वेळ आहे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अंबाजोगाई पंचायत समितीमध्ये तर अनागोंदी कारभार सुरू आहे येथे टेम्परवारी कर्मचाऱ्यांकडूनच कामे करून घेतली जातात व शासकीय कर्मचारी तथा अधिकारी हे दौऱ्यांचे स्वरूप दाखवून वारंवार गैरहजर राहतात यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे विशेष करून अंबाजोगाई पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या वारंवार गैरहजर राहतात यांच्यावर गट विकास अधिकारी यांच्याकडून काय कारवाई केली जाते हे आता पाहण्याचे उत्सुकता ग्रामीण भागातील लोकांमध्ये आहे जर कार्यालयीन वेळेत हजर नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गटविकास अधिकारी यांनी कारवाई केली नाही तर यांची तक्रार फोटोसहीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येण्याचा इशारा पंचायत समितीला देण्यात येत आहे
