वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांचे बंधू सुनील रामभाऊ मस्के (वाहन चालक जिल्हाधिकारी कार्यालय बीड )
यांना उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार
बीड प्रतिनिधी
दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट वाहन चालक म्हणून मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम गेवराई येथे संपन्न झाला. व या कार्यक्रमास मा. विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी बीड ( भा. प्र. से.) जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.जतीन रेहमान सर,(भा. प्र. से ) मा. आमदार. विजयसिंह पंडित गेवराई विधानसभा सदस्य तसेच जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यापूर्वी 2016 मध्ये मा. नवलकिशोर राम सर जिल्हाधिकारी (भा. प्र. से.) बीड यांच्या हस्ते उत्कृष्ट वाहनचालक म्हणून गौरविण्यात आले होते. वाहन चालक म्हणून 13 वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सेवा बजावत आहे.
