बीड

Spread the love

** क्रूर सावकाराचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला… सावकार जाधवचा मुक्काम आता कोठडीतच..

** “राम फाटले” कुटुंबीयांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा…

** बीड शहर बचाव मंचाचे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे यांचे मोठे यश 

** शेवटी 55 मिनिट कुटुंबाचे झालेले हाल व दुर्दशा ही सत्यस्थिती आदरणीय कोर्टापुढे भक्कमपणे व प्रभावीपणे मांडली…

      बीड प्रतिनिधी : बातमी –

*पिडित फटाले कुटुंबीयांना न्यायालयाचा दिलासा खाजगी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव याचा जामीन आदरणीय जि. न्यायालयाकडुन फेटाळण्यात आला आहे.

बीड: पेड बीड भागातील बहुचर्चित राम फटाले आत्महत्या प्रकरणी तुरुंगात असलेले खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचा आज मा.जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी तडकाफडकी जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे फटाले कुटुंबीयांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाबाबत थोडक्यात माहिती अशी की, पेठ बीड भागातील रहिवासी मयत राम फटाले हे खाजगी सावकारकीच्या फासात अडकले होते, खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचे कडून त्यांनी कुटुंबीयांच्या गरजा भागविण्याकामी खाजगी कर्ज उचलले होते ज्याची परतफेड व व्याज अदा करूनही त्यांना खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हे एनकेन प्रकारे त्रास देत होते, व आणखी पैशाची मागणीचा तगादा लावत होते, शेवटी राम फटाले यांचे कडे पैसे नसल्याने ते हवालदिल झाले यातच आरोपी लक्ष्मण जाधव यांनी राम याचेवर मानसिक दबाव आणून जर तुझ्याने व्याजाचे पैसे देणे होत नसेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे आणून सोड अशा प्रकारचा गलिच्छ प्रकार केल्यामुळे मयत राम फटाले हे मानसिक दबावाखाली आले व यातच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली व गळफास घेतला यास कारणीभूत असलेले व सत्ताधारी पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी असलेले खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृह बीड येथे करण्यात आली, त्यानंतर त्यांनी जामीन मिळणे कामी मा. सत्र न्यायालय बीड येथे त्यांचा जामीन अर्ज मांडला होता या मध्ये फिर्यादी पक्ष व आरोपी पक्ष यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला सदर सुनावणीनंतर मा. न्यायालयाने खाजगी सावकार आरोपी लक्ष्मण जाधव याचा जामीन अर्ज तडकाफडकी फेटाळला त्यामुळे फटाले कुटुंबीयांना न्यायालयाने फार मोठा दिलासा दिल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या वतीने बीड शहर बचाव मंचचे मुख्य कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे यांनी कागदपत्रांसह जोरदार युक्तिवाद केला तसेच सरकार पक्षातर्फे मा. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री.सरवदे साहेब यांनी देखील भक्कम बाजू मांडली व या आधारे सर्व पडताळणी करून मा. न्यायालयाने आरोपी लक्ष्मण जाधव याचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे आरोपीच्या तुरुंगातून बाहेर पडण्याच्या स्वप्नावर विरजण पडले आहे. तसेच शहरात खाजगी सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.बीड शहर बचाव मंचाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डीजे तांदळे सर, अध्यक्ष नितीन जायभाये, ॲड. नितीन वाघमारे आदि सर्व पदाधिकाऱ्यांनीॲड. अनिल बारगजे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.

क्रूर सावकाराचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला… सावकार जाधवचा मुक्काम आता कोठडीतच..

 “राम फाटले” कुटुंबीयांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा…

बीड शहर बचाव मंचाचे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे यांचे मोठे यश

 शेवटी 55 मिनिट कुटुंबाचे झालेले हाल व दुर्दशा ही सत्यस्थिती आदरणीय कोर्टापुढे भक्कमपणे व प्रभावीपणे मांडली…

      बीड प्रतिनिधी : बातमी –

*पिडित फटाले कुटुंबीयांना न्यायालयाचा दिलासा खाजगी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव याचा जामीन आदरणीय जि. न्यायालयाकडुन फेटाळण्यात आला आहे.

बीड: पेड बीड भागातील बहुचर्चित राम फटाले आत्महत्या प्रकरणी तुरुंगात असलेले खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचा आज मा.जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी तडकाफडकी जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे फटाले कुटुंबीयांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाबाबत थोडक्यात माहिती अशी की, पेठ बीड भागातील रहिवासी मयत राम फटाले हे खाजगी सावकारकीच्या फासात अडकले होते, खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांचे कडून त्यांनी कुटुंबीयांच्या गरजा भागविण्याकामी खाजगी कर्ज उचलले होते ज्याची परतफेड व व्याज अदा करूनही त्यांना खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हे एनकेन प्रकारे त्रास देत होते, व आणखी पैशाची मागणीचा तगादा लावत होते, शेवटी राम फटाले यांचे कडे पैसे नसल्याने ते हवालदिल झाले यातच आरोपी लक्ष्मण जाधव यांनी राम याचेवर मानसिक दबाव आणून जर तुझ्याने व्याजाचे पैसे देणे होत नसेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे आणून सोड अशा प्रकारचा गलिच्छ प्रकार केल्यामुळे मयत राम फटाले हे मानसिक दबावाखाली आले व यातच त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली व गळफास घेतला यास कारणीभूत असलेले व सत्ताधारी पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी असलेले खाजगी सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृह बीड येथे करण्यात आली, त्यानंतर त्यांनी जामीन मिळणे कामी मा. सत्र न्यायालय बीड येथे त्यांचा जामीन अर्ज मांडला होता या मध्ये फिर्यादी पक्ष व आरोपी पक्ष यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला सदर सुनावणीनंतर मा. न्यायालयाने खाजगी सावकार आरोपी लक्ष्मण जाधव याचा जामीन अर्ज तडकाफडकी फेटाळला त्यामुळे फटाले कुटुंबीयांना न्यायालयाने फार मोठा दिलासा दिल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या वतीने बीड शहर बचाव मंचचे मुख्य कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे यांनी कागदपत्रांसह जोरदार युक्तिवाद केला तसेच सरकार पक्षातर्फे मा. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री.सरवदे साहेब यांनी देखील भक्कम बाजू मांडली व या आधारे सर्व पडताळणी करून मा. न्यायालयाने आरोपी लक्ष्मण जाधव याचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे आरोपीच्या तुरुंगातून बाहेर पडण्याच्या स्वप्नावर विरजण पडले आहे. तसेच शहरात खाजगी सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.बीड शहर बचाव मंचाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डीजे तांदळे सर, अध्यक्ष नितीन जायभाये, ॲड. नितीन वाघमारे आदि सर्व पदाधिकाऱ्यांनीॲड. अनिल बारगजे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!