लोक जनशक्ती पार्टीच्या उपोषणा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा मी स्वतः उपोषणाला बसेल…. खासदार बजरंग बप्पा सोनवणे
बीड:
आंबेजोगाई ….. आंबेजोगाई शहरांमध्ये पुरातत्त्व विहिरीवर अवैधरित्या आंबेजोगाई नगर परिषदेने ताबा दिल्यामुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच अनुषंगाने माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांनी बीड जिल्हाधिकारी यांना एप्रिल महिन्यात पहिली तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने अनेक वेळा वेगवेगळे निवेदन देण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात आंबेजोगाई शहरात भीक मागून आंदोलन केले व त्यामध्ये जमा झालेली रक्कम आंबेजोगाई नगरपरिषदेला संबंधित विहीर मोकळी करण्यात यावी यासाठी लागणारा खर्च म्हणून देण्यात आली त्यातील पुढच्या टप्पा म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने
1) महाराष्ट्र बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवणाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे
2) गीर बुजवलेल्या ठिकाणी अनधिकृत पणे दुकाने बांधकाम परवाना देणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी
3) महाराष्ट्र बँकेसमोरील दुकाने वाढून ती विहीर पुनर्जीवित करण्यात यावी
अशा तीन मागण्या घेऊन लोक जनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक काळे पाटील हे उपोषणास बसले आहेत उपोषणाचा आज पाचवा दिवस असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP)बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट दिली व अंबाजोगाई मुख्य अधिकारी यांना उपोषणा संदर्भात ठोस निर्णय घ्या असे आदेश दिले अन्यथा मी सुद्धा अंबाजोगाई नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभार संदर्भात जिथे बसायचे आहे तिथे उपोषणाला बसेल असा सल्लाही मुख्याधिकारी यांना खासदारांनी दिला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP )चे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष अमर भैया देशमुख लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे शिवसेनेचे मदन भैया परदेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
