आंबेजोगाईत हृदयरोग बाल शिबिरामध्ये 154 बालकांची 2 डी इको तपासणी संपन्न
*अंबाजोगाई येथे मोफत बाल हृदय रोग शिबिरामध्ये 154 बालकांची 2 डी इको तपासणी संपन्न.*
——————————————-
*24 बालकांची होणार मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया डॉ नवनाथ घुगे यांची माहिती*
——————————————-
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
अंबाजोगाई येथील घुगे हार्ट अँड क्रिटिकल केयर हॉस्पिटल अंबाजोगाई येथे डॉ नवनाथ घुगे यांच्या पुढाकारणे
आय.एम.ए.अंबाजोगाई,रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम महाराष्ट्र शासन व बालाजी हॉस्पिटल,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत बाल हृदय रोग, 2- डी इको व कलर डॉपलर तपासणी,बालहृदय रोग शस्त्रक्रिया शिबीर रविवार दि.27 जुलै 25 रोजी पार पडले. या शिबिरात 154 बाल हृदय रोग असणाऱ्या बालकांची मोफत 2- डी इको व कलर डॉपलर तपासणी करण्यात आली. यामध्ये जवळपास 140 बालकांना हृदय रोग असल्याचे दिसून आले त्यापैकी 24 बालकांची हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे तपासणीत निदान झाले. या बालकांवर मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिवाय मुलाचा व त्याच्या पालकाचा जाण्या येण्याचा खर्च सुद्धा बालाजी हॉस्पिटलच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. नवनाथ घुगे यांनी सांगितले. या शिबिराचे फलित असे की, ग्रामीण भागातील या गोरगरीब व ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील मुलांची शस्त्रक्रिया होणार आहे.
हे शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ सर, डॉ सचिन शेकडे सर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन म्हणून जेष्ठ समाजसेवक व भाजपा नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर आय.एम.ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, उपाध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, सचिव डॉ.उद्धव शिंदे, बालाजी हॉस्पिटल, मुंबईचे सुप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ.श्रीपाल जैन, रोटरी क्लब अंबाजोगाईच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम महाराष्ट्र शासनचे समन्वयक रमेश तांगडे, डॉ.सुधीर धर्मपात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहिते यांनी केले तर मंजुषा जोशी यांनी उपस्थितानाचे आभार मानले.
याप्रसंगी डॉ.नवनाथ घुगे यांनी प्रास्ताविक केले व हे शिबीर आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. यावेळी बोलताना डॉ.घुगे म्हणाले की,घुगे हॉस्पिटल व संपूर्ण टीम मागील 20 वर्षांपासुन आय.सी. यू च्या माध्यमातून हजारो अतिगंभीर, हार्ट अटॅक, प्यारालिसिस, किडनी विकार, सर्पदंश, विषबाधा अशा अनेक गंभीर रुग्णावर यशस्वी उपचार करत आहेत. रुग्ण सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आजपर्यंत अनेक शिबिराचे आयोजन, व्याख्यान व इतर समाजपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आपल्या परिसरातील गरीब, गरजू जन्मजात हृदय विकार असणाऱ्या बालकांसाठी मोफत 2डी इको व कलर डोपलर तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले गेले आहे असे सांगितले. या प्रसंगी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील सुप्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांनी बालकांच्या हृदय रोगाबद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व शिबिरासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक बालकाची अचूक हृदय तपासणी करून त्यांना रोग मुक्त करण्याचे आश्वस्थ केले. RBSK चे समन्वयक रमेश तांगडे यांनी महाराष्ट्र शासन यांच्या वतीने उपलब्ध योजनाची माहिती दिली व भविष्यात वेगवेगळ्या आजाराची, गरीब गरजू रुग्णासाठी शिबीरे आयोजित करणार असल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय समारोप्रसंगी नंदकिशोर मुंदडा यांनी डॉ.नवनाथ घुगे व घुगे हॉस्पिटल, रोटरी क्लब, आय. एम. ए. अंबाजोगाई तसेच, बालाजी हॉस्पिटल,मुंबई व डॉ श्रीपाल जैन, RBSK टीम यांचे कौतुक केले.
या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरीब, गरजू रुग्ण यांची हृदय रोग तपासणी व शस्त्रक्रिया मोफत होणार असून ते रुग्ण कायमस्वरूपी हृदय रोग मुक्त होणार आहेत, याबद्दल या परिसराचा प्रतिनिधी म्हणून अतिशय आनंद होतं असल्याचे सांगितले. या पुढे ही भविष्यात सर्वांच्या सहयोगाने वेगवेगळ्या आजाराबद्दल तपासणी व उपचार शिबीरे तसेच जनजागृती करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या शिबिरामध्ये 24 बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सर्व रुग्ण व नातेवाईक याच्यासाठी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे जाण्यासाठी व ऑपेरेशन नंतर परत गावी येण्यासाठी येण्यासाठी मोफत ट्रॅव्हल्सची सोय केली जाईल. तसेच रुग्णालयात राहण्याची, जेवणाची व मोफत शस्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात आलेली आहे. अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात साधारणतः अडीच लाख रुपये खर्च येतो. या शिबिरामधील सर्व बालकांची मोफत पणे निःशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आय.एम. ए अंबाजोगाई चे सर्व पदाधिकारी,सर्व सदस्य, रोटरीचे माजी अध्यक्ष कल्याण काळे, माजी सचिव धनराज सोळंकी, रो संतोष मोहिते, रो डॉ.निशिकांत पाचेगांवकर, रो बालाजी घाडगे, रो अविनाश मुडेगावकर, रो रुपेश रामावत, रो प्रवीण चोकडा, रो राधेश्याम लोहिया, रो अभिषेक मुंदडा, तसेच अनेक रोटरी सदस्य, बालाजी हॉस्पिटल मुंबईचे प्रतीक मिश्रा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम महाराष्ट्र शासन यांचे समन्वयक रमेश तांगडे, डॉ.राहुल वरोडे, डॉ.पांडुरंग बोन्दरे, डॉ. कमलाकर साखरे, डॉ.महेंद्र लोमटे, डॉ.स्वाती जावळे मॅडम, डॉ.संजय पूजदेकर, डॉ.दीपाली मो्हेकर,डॉ. प्रदीप देशमुख, राहुल शिंदे, अमर गालफाडे,मोहनदास वैष्णव, श्रीमती प्रतिभा परळकर, श्रीमती कामिनी केंद्रे, RBSK चे इतर सर्व कर्मचारी, घुगे हॉस्पिटल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरात तपासणी केल्यानंतर, डॉ.जैन यांनी पालकांना बाळाच्या आजाराबादल व्यवस्थित तपासणी करून धीर दिल्यावर, व तुमच्या बाळाचे आम्ही यशस्वी ऑपरेशन करू हे शब्द ऐकल्यावर त्या पालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तो पाहून अतिशय समाधान झाले व शिबीर घेण्याचा खरा उद्देश साध्य झाल्याचे समाधान डॉ.नवनाथ घुगे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब व ऊसतोड कामगारांच्या लहान लहान मुलांच्या हृदयाची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता कारण महागड्या स्वरूपाचा खर्च असताना हा खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांना सतावत होता मात्र भव्य हॉस्पिटल आणि मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल व इतर संस्थांच्या सहकार्याने गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले.
