राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट,,,!
*
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार नवं पर्वाचा या अभियानातर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा चालू आहे. त्यानिमित्ताने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हे अभियान राबवित आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार तसेच या मोहिमेच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे,आमदार विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे बीड येथील आपला नियोजित कार्यक्रम आटोपून अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राजकिशोर मोदी यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत या सन्मान केला. या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात सखोल असा विचारविनिमय करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे विचार तळागाळातील सामान्य मतदारांपर्यंत पोचवून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे विचार वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे अशा सूचना देखील माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांनी यावेळी अंबाजोगाई शहर व परिसरात राजकिशोर मोदी यांनी मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची प्रशंशा केली. यापुढेही राजकिशोर मोदी यांना आगामी काळात येणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी ना अजितदादा यांच्या माध्यमातून आपला संपूर्ण पाठिंबा असेल असेही अभिवाचन खासदार सुनील तटकरे यांनी दिले. यावेळी राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी संकेत मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, अंबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, मनोज लखेरा,बबन लोमटे, महादेव आदमाणे, अमोल लोमटे,दिनेश भराडीया, धम्मा सरवदे, डॉ राजेश इंगोले, किशोर परदेशी, कचरू सारडा, माणिक वडवनकर ,गणेश मसने,अंकुश हेडे, पंडित हुलगुंडे, चंद्रकांत महामुनी, अकबर पठाण, भीमसेन लोमटे, गोविंद पोतंगले, शेख मुक्तार, राजू मोरे,शाकेर काझी, जावेद गवळी, खलील जाफरी, विश्वजित शिंदे, दत्ता सरवदे, महेश कदम,सय्यद रशीद, सचिन जाधव, सय्येद ताहेर, राम घोडके, मुनिर शाह, शुभम लखेरा, जमादार पठाण, उज्जेन बनसोडे , मतीनं जरगर ,अजीम जरगर, विशाल पोटभरे, काशिनाथ चव्हाण, दौलत पठाण, संतोष चिमणे,वजीर शेख,रोहन कुरे, आकाश कऱ्हाड, शरद काळे, रोशन लाड, पवन टेकाळे, शिवम पवार, सुशील जोशी, यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
