राज्याचे उपमुख्यमंत्री व धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आंबेजोगाईत उत्साहात साजरा,,,!
*राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार व आ धनंजय मुंडे यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या प्रारंभी ६३ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान*
*श्री योगेश्वरी देवी महाआरती, किरमानी दर्गा व संघर्ष भूमी येथे वंदन*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवसॅनिमित्त आयोजित सेवा सप्ताहात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहाचा प्रारंभ ग्रामदैवता माता श्री योगेश्वरी देवीची महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर चनई येथील किरमानी बाबांच्या दर्ग्यावर फुलांची चादर चढवून अजितदादा पवार व धनंजय मुंडे यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, ऍड विष्णुपंत सोळंके,सत्यजित सिरसाट राजाभाऊ औताडे, बालासाहेब शेप,बबन लोमटे यांच्यासह शेकडो सहकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी तथा बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांच्या पुढाकारातुन १५ ते २२ जुलै दरम्यान “सात दिवस सात उपक्रम” संकल्पनेवर आधारित अंबाजोगाई शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा अंतर्गत आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण तथा जनजागृती अशा विविध विषयावर आधारित विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
या सेवा सप्ताहाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजकिशोर मोदी, ऍड राजेश्वर चव्हाण, स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ राकेश जाधव, मानसोपचार तज्ञ डॉ राजेश इंगोले व उद्धवबापू आपेगावकर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी ६३ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यात विविध खात्यांचा पदभार सांभाळून राज्यात विविध विकासकारि, लोकोपयोगी तथा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे राबवून आपल्या कर्तृत्वाची छाप राज्यभर उमटवली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची फळी निर्माण केली आहे.
आमदार धनंजय मुंडे यांनी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही व माझ्या सहकार्यांनी तो साजरा न करण्याचे आवाहन केले असले तरी राज्यभरात त्यांचे हजारो सहकारी तसेच चाहते असल्याने धनंजय मुंडे यांचा वाढदिवस विविध विधायक तथा सामाजिक उपक्रम राबवून आज राज्यभरात वाढदिवस साजरा करत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहानिमित्त महारक्तदान शिबिरासाठी स्वा रा ती च्या रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ अरविंद बगाटे,डॉ विनय नाळपे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पारखे, डॉ अक्षय कदम,डॉ अकांक्षा उम्रेडकर , डॉ जान्हवी पाटील, सार्थक उदावंत, शेख बाबा, प्रिया गालफाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात महादेव आदमाने ,अंकुश हेडे, दत्ता सरवदे, महेश कदम यांचे अनेक सहकारी मित्र रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपने आले होते. दि१५ मंगळवार रोजी सेवा सप्ताहात अजित गरड, गोविंद देशमुख, विलास मोरे, विश्वभर फड, बाळासाहेब देशमुख, मनोज लखेरा, कचरूलाल सारडा, किशोर परदेशी, संकेत मोदी, धम्मा सरवदे, दिनेश भराडीया, सुनील वाघळकर, चंदू महामुनी, सुधाकर टेकाळे, राजाभाऊ शेप, दिलीप चामणर , खंडू गोरे,भीमसेन लोमटे, पंडित हुलगुंडे,खलील जाफरी, दत्ता सरवदे, रणजित लोमटे, जावेद गवळी , महेबूब गवळी, अकबर पठाण, रशीद भाई, सचिन जाधव, सय्यद ताहेर,विशाल पोटभरे, गोविंद पोतंगले,आकाश कऱ्हाड, अस्लम शेख, मणियार, कैलास कांबळे, रोहन कुरे,शरद काळे वजिर शेख,अजिम जरगर, संतोष चिमणे, रोहित हुलगुंडे, अमित परदेशी रोशण लाड , तौफिक सिद्दीकी यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
