*अंबाजोगाई तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजीत लोमटे तर शहराध्यक्षपदी मोहम्मद असेफोद्दीन बाबा खतीब यांची निवड*
*अंबाजोगाई(प्रतिनिधी)*
बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहीर झाल्या असून अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोमटे तर शहराध्यक्षपदी मोहम्मद असेफोद्दीन खतीब यांची निवड करण्यात आली.
बीड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वच तालुक्यातील अध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा रजनीताई पाटील यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री अशोकराव दादा पाटील,आदित्य दादा पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भैया सोनवणे, प्रवीण कुमार शेप, पशुपतीनाथ दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केल्या यात अंबाजोगाई तालुक्यात बहुजन चळवळीत काम करत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत कार्याचा ठसा उमट्वनारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांना तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली तर पन्नास वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी बांधकाम सभापती मोहम्मद असेफोद्दीन खतीब यांची अंबाजोगाई शहराच्या शहराध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड जाहीर होताच सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत होत आहे.
काँग्रेस हा अंबाजोगाई चा बालेकिल्ला आहे आगामी काळात जुने व नवे एकत्र करत पक्ष संघटना बांधणी करून काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राखण्याचा प्रयत्न करू असे काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब यांनी निवड जाहीर झाल्यानंतर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
