आंबेजोगाईत महा शिबिरात 240 जणांनी केली विविध आजारांची तपासणी
*अंबाजोगाईत आयएमए व रोटरीच्या वतीने पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची केली आरोग्य तपासणी*
——————————————-
*महा शिबिरात 240 जणांची केली विविध आजारांशी तपासणी*
——————————————-
*अंबाजोगाई/ प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहर व परिसरातील जनसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे आणि यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना कर्तव्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. समाजाप्रती जीवन समर्पित करणाऱ्या पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि.15 जून रोजी आय.एम.ए अंबाजोगाई व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले.
आयएमए अंबाजोगाई व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने सतत सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक दायित्व म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला मदत व सहकार्य व्हावे आणि सामाजिक देणे लागतो या भूमिकेतून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलीस या शब्दातच धाक आणि दरार आहे. कारण हा घटक म्हणजे समाजातील सर्वोच्च आणि महत्त्वाचा घटक आहे. हा घटक जर व्यवस्थेत (सिस्टीममध्ये) नसेल तर सर्वत्र अनागोंदी माजलेली असते परंतु ‘ पोलीस आहेत म्हणून आपण आहोत ‘ या जाणिवेतून आयएमए व रोटरी क्लब यांनी संयुक्तपणे पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबासाठी महारोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. हे शिबिर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी रविवार दि.15 जून रोजी आयोजित केले गेले.या शिबिरात अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी, अधिकारी,चालक, रीडर यांनी सहभाग नोंदवला. या आरोग्य शिबिरात वेगवेगळ्या २० आजारांचे तज्ञ सहभागी झाले होते. या शिबिरात केवळ पोलीसच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा सहभागी करून घेतले. उद्घाटन कार्यक्रमात अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पो.नि.मुरलीधर खोकले म्हणाले की, रोटरी व इंडियन मेडिकल
असोसिएशन यांनी पोलिस बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय दिला.
ताण,तणाव व कामाचा व्याप यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर ताण येतो. यासाठी त्यांनीं वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली पाहिजे.
असे सांगून आय एम ए अंबाजोगाई व रोटरी क्लबने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पोलिस निरीक्षक शरद जोगदंड,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्या मागची भूमिका मांडली. व पोलिसांनी या धावपळीच्या युगात कामाचा ताण न घेता आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचा मौलिक सल्ला दिला.
कार्यक्रमाचे संचलन धनराज सोळंकी यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अंगद कराड, मंजुषा जोशी,स्वप्नील परदेशी, संतोष मोहिते,आनंद आनंद कर्नावट,बाळासाहेब कदम, गोपाळ पारीख,प्रदीप झरकर ,डॉ.अनिल केंद्रे, भीमसेन लोमटे,रुपेश रामावत,प्रा.अजय पाठक,सचिन बेंबडे,बालाजी घाडगे,गणेश राऊत,भीमाशंकर शिंदे,रमेश देशमुख,संजय गौड,रुपेश चव्हाण,संजय देशमुख,जतिन कर्णावट यांनी परिश्रम घेतले.
महाआरोग्य शिबिरात
डॉ.नवनाथ घुगे,डॉ.राहुल धाकडे,डॉ.अतुल शिंदे,डॉ.संजय शेटे,डॉ.अनिल मस्के,डॉ.अरुणा केंद्रे,डॉ.अनिल भुतडा,
डॉ.मनिषा भुतडा,डॉ.स्नेहल होळंबे,डॉ.चेतन आदमाने,डॉ.सचिन पोतदार,डॉ.उद्धव शिंदे, डॉ.जबेर शेख,डॉ.विजय लाड,डॉ.निलेश तोष्णिवाल,डॉ.विनोद जोशी,डॉ.योगेश मुळे,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.शाहिद शेख, ,डॉ.ऋषिकेश घुले,डॉ.प्रियंका आरबडवाड या डॉक्टरांनी सहभाग घेतला .
या शिबिरात हृदयरोग,मधुमेह, छातीविकार व दमा, अस्थिरोग,बालरोग,नेत्र तपासणी,स्त्रीरोग, दंत चिकित्सा, त्वचारोग,यासह
इसीजी, रक्तातील कोलेस्टरोल , रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्याही करण्यात आल्या.
