आंबेजोगाई नगर परिषदेच्या समोर 14 मे पासून वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण,,,?
मागण्या मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे 14 मे पासून अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन…
आंबेजोगाई प्रतिनिधी
दिनांक 08/05/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीने शहरातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन नगर परिषद कार्यालयास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला.
या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने अंबाजोगाई शहरातील विविध समस्या बाबत नगर परिषद अंबाजोगाई प्रशासनास आम्ही वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करत संबंधित खालील विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांना सूचित करत त्या समस्या सोडविण्यासाठी निवेदने सादर केली , परंतु संबंधित विभाग व अधिकारी यांच्याकडून दखल न घेता टाळाटाळ केल्या कारणाने आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले . जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही याची नोंद घेत प्रशासनास पी टी आर नोंदणी, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र सुरू करणे, कंत्राटी सफाई कामगारांचे थकीत वेतन अदा करणे, शासकीय कर्मचारी यांचे वेतन अदा करणे, दिव्यांगांचा 5 टक्के राखीव निधी लाभार्थ्यांना अदा करणे, भीमाई नगर व साकुड रोड परिसरात शहरी योजनांचा लाभ देत हा भाग शहरी हद्दीत घेणे अशा विविध पुढील प्रमाणे
मागण्या घेऊन निवेदन सादर केले.
१) प्रभाग क्रमांक 4 (परळीवेस भाग) सह शहरातील सर्व प्रभागा मध्ये मालमत्ता / मागणी कर नोंदवहीत नोंद नसणारे मालमत्ता करापासून वंचित असणाऱ्या मालमत्तांचे पुनः सर्वेक्षण करत तात्काळ पथक प्रमुख व सहायक यांची नेमणूक करून 15 दिवसांच्या आत सर्वांचे सर्वेक्षण करत पी. टी .आर. नोंदणी करण्यात यावी.
सदरील प्रक्रियेत टाळाटाळ करत असल्यास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. २) रमाई आवास घरकुल योजना दुसऱ्या टप्प्यात 123 मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यासाठी दिनांक 28/04/2025 रोजी अंबाजोगाई नगर परिषद खात्यात वर्ग केला असून , संबंधित मंजूर लाभार्थ्यांना “मंजुरी पत्र” देत लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वितरीत करण्याची प्रक्रिया आठ दिवसांच्या आत पूर्ण करावी.३) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी आपण सांगितल्या प्रमाणे 14 एप्रिल पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेच लोकार्पण न करता आंबेडकर अनुयायी व गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण न करता वेळ काढू भूमिका समोर ठेवत उद्घाटन करण्याचे ठरवले त्यात अद्याप पर्यंत या अभ्यासिकेच्या उद्घाटनाची कोणतीही कार्यक्रम पत्रिका न जाहीर केल्याने आम्ही सर्व विद्यार्थी व आंबेडकर अनुयायी 14 मे नंतर अंबाजोगाई शहराच्या शैक्षणिक विकास व वारसासाठी कोणत्याही क्षणी लोकार्पण करत असल्याबाबत.४) शहरात दिवसेंदिवस सर्वच प्रभागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असून रोगराई व आजाराचे प्रमाण शहरात पाण्यामुळे वाढत असून संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करत पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत.५) तसेच गृहनिर्माण विभाग, शासन परिपत्रक, दिनांक 20/10/2018 नुसार प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास घरकुल योजना (शहरी) करिता मागील तीन वर्षांच्या कराच्या पावतीच्या आधारे लाभार्थी पात्र करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला त्याची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत.६) नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करणेबाबत .७) नगर परिषद अंतर्गत सेवेत असणाऱ्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे “मार्च व एप्रिल” महिन्याचे वेतन अदा करत संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन न थकीत करता वेळेवर वेतन अदा करण्यात यावे.८) दिव्यांग बांधवांचा 5 टक्के राखीव निधी तात्काळ दिव्यांगांच्या खात्यात वितरीत करण्यात यावा.९) रविवार पेठ पाण्याची टाकी जवळील साकुड रोड भागातील भीमाई नगर, परशुराम नगर व ईदगाह परिसर या भागातील नागरिकांना पंतप्रधान शहरी आवास योजना, शहरी रमाई आवास घरकुल योजना व शहर विकासा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यात यावा आणि हा भाग नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्यात यावा..
या सर्व वरील मागण्या मान्य करण्याचे विनंती पत्र वंचितने सादर केले असून यावेळी वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, महासचिव नितिन सरवदे, लखन होके, सुनिल कांबळे, समाधान कसबे, शिवा सोनवणे, दिपक पोटभरे आदी उपस्थित होते…
