ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी अमोल वाघमारे यांची निवड
अमोल वाघमारे यांच्यावर संपूर्ण मराठवाड्यातून शुभेच्छांचा वर्षाव,,!
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व जाहीर सत्कार,,,!
आंबेजोगाई प्रतिनिधी
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या उपस्थितीत आंबेजोगाई चे युवा नेतृत्व माननीय अमोल भानुदास वाघमारे यांची ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी दिनांक सत्तावीस तीन 2025 रोजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड केली आहे .
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून दलित शोषित पीडित आदिवासी मुस्लिम बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे देशात अस्तित्वात असलेल्या मनुवादी व्यवस्थे विरोधात संविधान वाचविण्याचा लढा तीव्र करावा जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा जनसामान्यांचे जन आंदोलन उभा करावे दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती सारखी परिस्थिती असून दलित अत्याचाराविरोधात लढा जोडण्याचे काम करावे जातीयता ही कोरोनापेक्षाही भयानक व्हायरस आहे हा व्हायरस नष्ट करण्याच्या उद्देशाने परिपक्व असे आंबेजोगाई चे भूषण अमोल भानुदास वाघमारे यांची मराठवाडा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी राज्याध्यक्ष विनोद भोळे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई लोंढे ह्या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण मराठवाड्यातून अमोल वाघमारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
