डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन रद्द करा अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर : जिल्हाध्यक्ष अशोक येडे
डॉ. अशोक थोरात शैल्य चिकित्सक यांचे निलंबन तात्काळ रद्द करा नसता आम आदमी पार्टी आंदोलन करणार*
माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
_________________________________
बीड _ आम आदमी पार्टीच्या वतीने मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे की दिनांक 25 मार्च 2025 रोजी अधिवेशनात मा. आमदार मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली त्यावर आरोग्य मंत्री यांनी कसलाही विचार न करता तडका फडके राजकीय दबाव तंत्रा पोटी डॉ. अशोक थोरात शैल्य चिकित्सक बीड. यांचे निलंबन करण्यात आले या विषयावर विभागीय चौकशी चालू असताना त्या चौकशीच्या घेय्रामध्ये बारा अधिकारी असताना एकावरच कारवाई का? असा प्रश्न देखील उद्भवत आहे डॉ. अशोक थोरात यांचे कोविड काळातील आरोग्यसेवा ही चांगल्या प्रकारे व उत्कृष्ट दर्जाची देण्याचे काम बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आले होते त्या सेवेचा देखील विचार केला गेला पाहिजे पण तोही केला गेला नाही त्या काळामध्ये नागरिकांना जीव वाचवणे हे सर्वात पहिले उद्दिष्ट होते ते कार्य 24 तास संपर्कात राहून जनतेला सेवा देण्याचे काम या आरोग्य अधिकाऱ्याने केलं जर काही चुकीचे घडले असेल तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे परंतु यामध्ये संपूर्ण चौकशी न होता सर्वांची चौकशी करून त्यामध्ये लिप्त असणारे अधिकारी कर्मचारी व त्या काळातील पालकमंत्री यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे फक्त एकाचाच राजकीय बळी चांगल्या अधिकाऱ्याचा चढू नये यामुळे हे निलंबन रद्द अशा कारवाईमुळे बीड जिल्ह्यामध्ये चांगले अधिकारी एक तर येतच नाहीत आले तर त्यांना टिकू दिले जात नाही हे निलंबन रद्द करून तात्काळ त्यांना सेवेत रुजू करावे अशी आम आदमी पार्टी च्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री बीड माननीय आरोग्य मंत्री यांना निवेदनाद्वारे व जनसामान्यांची भावना आहे या भावनेला लक्षात घेऊन आपण यावर योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी व बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत याची सर्व जवाबदारी ही आपल्या प्रशासनाची असेल असे निवेदन देण्यात आले यावेळी
माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष, सय्यद सादेक, शहर अध्यक्ष आजम खान तालुका उपाध्यक्ष, रफिक पठाण अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख, कैलास चंदपालीवाल जिल्हा कोषाध्यक्ष, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
