*अंबाजोगाईत राज्यस्तरीय लावणी महोत्सव, स्पर्धा मोठ्या थाटात पार, संपूर्ण राज्यातून कलावंतांची उपस्थिती,,!*
**************************
*लोपपावत चाललेल्या लावणीला जिवंत करण्याचं काम संजय जोगदंड करत आहेत : पोलीस निरीक्षक, शरद जोगदंड,,,!!*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लोप पावत चाललेल्या लावणीला जिवंत करण्याचं काम न्युज लोकमन च्या माध्यमातून संजय जोगदंड करतआहेत, असे आपले स्पष्ट मत मनोहर आंबा नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री शरद जोगदंड यांनी व्यक्त केले ते,दैनिक लोकनायक व न्यूज लोकमन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते,
यावेळी मंचावर मुंबई हायकोर्ट चे अधिवक्ता, श्री शंकर चव्हाण त्याचबरोबर अंबाजोगाई चे युवा उद्योजक, दिग्विजय कंट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दिग्विजय बाळासाहेब सोनवणे,, चव्हाण मोटर्सचे सर्वेसर्वा विकास चव्हाण, अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती दहिवडे सह सुनंदा वाघमारे ह्याही आवर्जून उपस्थित होत्या..




