अंबाजोगाई

Spread the love

*कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन लंडन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या फेलोशिपने ह्दयरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे सन्मानित*

——————————————–

*अंबाजोगाई/प्रतिनिधी* 

 अंबाजोगाई शहरात गेल्या 21 वर्षापासून सातत्याने 365 दिवस रुग्णसेवेत अहोरात्रपणे कार्य करणारे आणि असंख्य रुग्णांना मरणाच्या दारातून परत आणणारे ह्दयरोगतज्ञ व मधुमेहतज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांच्या कार्याला झळाळी मिळाली असून लंडन येथील कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्याना अंतराष्ट्रीय फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. डॉ.नवनाथ घुगे यांना अंतराष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप मिळवणारे ते एकमेव ह्दयरोगतज्ञ आहेत. त्यांना मिळालेल्या फेलोशिपबद्दल सर्वस्तरांतुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 डॉ.नवनाथ घुगे यांनी वैद्यकीय सेवेते पाउल ठेवल्यानंतर सेवाभाव हा गुण जोपासात महानगरांमध्ये असलेली चांगल्या पॅकेजची नौकरी सोडून भवितव्य असेल की नसेल याचा विचार न करता आपल्या मायभुमीत पाय ठेवत अंबाजोगाई शहरात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून आणि महागडी यंत्रणा कार्यान्वित करुन रुग्णांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा दिली पाहिजे या जाणीवेतून अंबाजोगाईतील पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले. त्यासोबतच इतर सहकारी पाच डॉक्टरांना सोबत घेवून रुग्णाना सर्व आजारांचे निदान आणि उपचार एकाच ठिकाणी करता आले पाहिजेत यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली.त्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांना चांगल्या सुविधा एकाच छताखाली देण्यात डॉ.नवनाथ घुगे यांना यश आले आहे. त्यासोबतच अंबाजोगाई शहरात त्यांनी सुपर स्पेशालिटी आयसीयू हॉस्पिटल, एमआरआय सेंटर व इतर वेगवेगळ्या सेवा सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. रुग्णांची एखाद्या तपासणीमुळे गैरसोय होवू नये किंवा तो दगावू नये याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. गेल्या 21 वर्षामध्ये त्यांच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक आणि सन्मान वेगवेगळ्या संस्थांनी केलेला आहे. नामांकित पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.त्यातच आता त्यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराला मानाचा तुरा मिळाला आहे. ज्यामध्ये अंतराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन लंडन या संस्थेने डॉ.नवनाथ घुगे यांना फेलोशिपने चेन्नई येथे आयोजित जागतिक वैद्यकीय परिषदेच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रो.डॉ.जे.ए.जयालाल यांच्या हस्ते फेलोशिप प्रदान करण्यात आली. कॉमनवेल्थ मेडिकल असोसिएशन हे जगातील 54 देशांचे संघटन आहे त्या मार्फत जागतिक आरोग्य सेवा, पर्यावरण व वातावरणातील बदल, प्रदुषण, आरोग्य शिक्षण, आरोग्य विषयी संशोधन अशा अनेक विषयांवर जागतिक स्तरावर काम करणारी संघटना आहे. या संघटनेने डॉ.नवनाथ घुगे यांना गौरविल्याबद्दल हा मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या कार्याला गती देण्याचे काम त्यांच्या पत्नी सौ.सारिकाताई नवनाथ घुगे यांनी केले आहे.कारण वैद्यकीय सेवेत काम करीत असताना पूर्ण समर्पित सेवेतून काम करावे लागते पण जी कौटुंबिक जबाबदारी असते त्याकडे दुर्लक्ष होते अशा काळात सौ.सारिकाताई घुगे त्यांनी ती उणीव भरून काढत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.डॉ . घुगे यांना फेलोशिप प्रदान केल्यानंतर राज्याच्या पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ.नमिताताई मुंदडा, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. पंडितराव दौड, आय.एम.ए.चे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ रवींद्र कुटे( माजी राज्य अध्यक्ष आय एम ए) माजी आ. संजयभाऊ दौंड, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, आ. पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!