अंबाजोगाई

Spread the love

अंबाजोगाईत घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल, रोटरी क्लब अंबाजोगाई व लिटल हार्ट केअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात १५३ बालकांची मोफत हृदय तपासणी ; 20 चिमुकल्यांवर पुण्यात होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

 अंबाजोगाई / प्रतिनिधी

 

येथील घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत बालहृदय रोग तपासणी व २-डी इको कलर डॉपलर शिबीर उत्साहात पार पडले.या शिबिरात एकूण १५३ बालकांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली . त्यापैकी गंभीर आजार आढळलेल्या २० बालकांवर पुणे येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांनी दिली.

 

        हे भव्य शिबीर घुगे हॉस्पिटल, आय.एम.ए. महाराष्ट्र राज्य, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासन आणि लिटल हार्ट केअर हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी आय.एम.ए. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर रोटरीच्या अध्यक्ष प्रा.रोहिणी पाठक, पुणे येथील प्रसिद्ध बालहृदय रोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगांवकर, हृदय रोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.राहुल धाकडे, बालरोगतज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी, बालरोगतज्ञ डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.सचिन पोतदार, डॉ.अतुल शिंदे, डॉ. महेंद्र लोमटे आणि RBSK चे समन्वयक श्री. रमेश तांगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

  डॉ.नवनाथ घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट करत गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देण्याचा मानस व्यक्त केला. आजपर्यंत अनेक शिबिराच्या माध्यमातून 200 पेक्षा जास्त बालकांची मोफत शास्त्रक्रिया केल्याचे नमूद केले त्यासोबतच यापूर्वी घेण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून अनेक पालकांना हृदयाच्या समस्यांचे निदान झाले त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आल्याने आज ती बालके ठणठणीत बनली आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा अशा शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणारच त्याचे डॉ. नवनाथ घुगे यांनी सांगितले. या शिबिरास नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आवर्जून भेट देत तज्ञ डॉक्टरांचा सत्कार केला.

  डॉ.पंकज सुगांवकर व डॉ. श्रीनिवास रेड्डी यांनी बालकांमधील हृदयविकाराची लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये बालकांची 2 डी इको कलर डॉपलरची तपासणी डॉ. पंकज सुगांवकर यांनी केली. आणि यामध्ये ज्या बालकांना हृदय शस्त्रक्रियेची गरज असेल त्यांची ते मोफत शस्त्रक्रिया पुणे येथे करणार आहेत. आजपर्यंत मागील 15 वर्षांमध्ये डॉ.सुगांवकर यांनी यशस्वी 8500 पेक्षा जास्त बालहृदय शास्त्रक्रिया केल्या आहेत.

 अध्यक्षीय समारोप करताना अक्षय मुंदडा यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामीण भागातील मुलांसाठी हे शिबीर जीवनदान ठरेल असे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष मोहिते यांनी केले तर प्रा.रोहिणी पाठक यांनी आभार व्यक्त केले. या शिबिरामुळे अंबाजोगाई व परिसरातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे, डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ.गवळी, डॉ.शहाजी लोमटे, धनराज सोळंकी,कल्याण काळे, अविनाश मुडेगावकर,राधेश्याम लोहिया, राजेंद्र घोडके, बालाजी घाडगे, RBSK चे डॉ.राहुल वरोडे, डॉ.संजय पूजदेकर, डॉ.स्वाती जावळे, डॉ.कमलाकर साखरे, डॉ घुबडे, डॉ. बाराहाटते, डॉ.दीपाली मो्हेकर, घुगे हॉस्पिटलचे कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!