अंबाजोगाई

Spread the love

स्विफ्ट डिझायरची ॲटोला भीषण धडक

१ महिला ठार, ८ महिला गंभीर जखमी

लोणार तालुका प्रतिनिधी/सागर पनाड

लोणार तालुक्यातील किनगावजटू येथून मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी महिलामजूर ॲटोने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने ॲटोला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना रविवार (१ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

किनगावजटू येथून मातमळकडे जाणारा ॲटो (क्र. MH28 R 2211) सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर आला असता, सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. MH43 AF 5821) ॲटोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ॲटो पलटी झाल्याने त्यातील महिलामजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या.

या दुर्घटनेत जरीनाबी अय्युबशहा (वय 45) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर

रंजना परमेश्वर कास्तोडे (53), शांताबाई शेवाळे (45), कल्पना विठ्ठल जमधाडे (40), अलका मधुकर शेवाळे (40), लक्ष्मण बबन करवते (45), चंद्रभागा गजानन नागरे (40), राधा गजानन गायकवाड तसेच ॲटोचालक आसिफ निंशालशहा (30) हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिंवराखंड येथील असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेने जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!