अंबाजोगाई

Spread the love

 

शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या चौथ्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचे १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजन

 

तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व शालेय विद्यार्थ्यांनी या सामान्य ज्ञान परीक्षेत सहभागी व्हावे – विजय रापतवार

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी प्रमाणे यावेळी देखील शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व त्यांच्याच जीवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार व सचिव विष्णू सरवदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खाजगी शाळासाहित जिल्हा परिषदेच्या शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांनी या सामान ज्ञान परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी प्रतिष्ठानचे हे चौथे वर्ष असून या स्पर्धांना मागील काळात विद्यार्थी व शाळांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे.

       प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा ही इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटात होणार असून या स्पर्धेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम व सन्मानचिन्ह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा यासाठी ही सामान्य ज्ञान परीक्षा उपयुक्त ठरत असल्याचे शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणच्या वतीने अधोरेखित करण्यात आले आहे.

          ग्रामीण भागातील तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा पासून वंचित असतात . शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमने हीच बाब हेरून खाजगी संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशी स्पर्धा परीक्षा अवगत व्हावी तसेच इथला विद्यार्थी देखील कोणत्याही स्पर्धेसाठी तयार व्हावा या उद्देशाने अंबाजोगाई शहर तथा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांसाहित खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे . शहरातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत असल्याने ते अशा स्पर्धा परीक्षेत पारंगत होतत . मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व शाळेतील विद्यार्थीना आजही शाळेत पाहिजे तशा सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे येथील विद्यार्थी हा काही अंशी पाठीमागे राहिल्याचे आढळतो. त्यामुळेच विशेष करून जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे प्रतिष्ठाणच्या वतीने ठरविण्यात आले आहे.

        सदर परीक्षा ही दोन गटांमध्ये होणार असून त्यामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी लहान गट व इयत्ता ८ वी ते १० वी मोठा गट असे करण्यात आले आहेत. या दोन्ही गटामधून परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास १५०१/- रुपये रोख व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास १००१/- रुपये रोख, व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ७०१/- रुपये व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

        प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान ही परीक्षा रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वा अंबाजोगाई शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या संकल्प विद्या मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे .अशा प्रकारच्या सामान्य ज्ञान परीक्षेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून त्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव होण्यास मदत मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना यापुढील काळातील त्यांच्या उज्वल वाटचालीसाठी खूप मोठा फायदा झाल्याचे पहावयास मिळनार आहे. तेव्हा सदरील स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांच्यासह उपाध्यक्ष पांडुरंग नरवडे, सचिव विष्णू सरवदे , सहसचिव शेख इरफान , कोषाध्यक्ष साधू गायकवाड, सल्लागार दत्ता देवकते,उमेश नाईक, सदस्य अनुरथ बांडे , बाळासाहेब माने , सुनील पवार , शेख आरिफ, शेख इरफान, उत्तरेश्वर मिटकरी, महेश वेदपाठक, संदीप दरवेशवार, समाधान धिवार, अशोक पोपळघट, गणेश तौर,श्रीनिवास मोरे रत्नाकर निकम, राजीव पटेल,श्रीधर देशपांडे, संत कराड, बालाजी जाधव,बालाजी टिळे, महेश पवार, मोरोपंत कुलकर्णी , आत्माराम बनसोडे ,जगन्नाथ वरपे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!