आनंद ग्राम यात्रींच्या वतीने
संध्याताईंच्या वडिलांचे स्वारातीत देहदान
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
गेली अनेक वर्षांपासून एच आय व्ही बाधित झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या बीड येथील आंदग्राम येथील दत्ता बारगजे यांच्या सहचरणी संध्या बारगजे यांचे वडील गणपत यशवंतराव चाटे यांचा देह आज स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्यात आला.
आनंद ग्राम च्या संध्याताई बारगजे यांचे वडील गणपत यशवंतराव चाटे यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांचा देह आज रीतसर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला.
सायंकाळी ५:३० च्या सुमारास आनंद ग्राम येथून आनंदयात्रींच्या वतीने गणपतराव यांचे पार्थिव स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमानी पासुन दत्ता बारगजे व संध्याताई बारगजे यांनी हातात पुष्पचक्र घेऊन “देहदान ससर्व श्रेष्ठ दान” “भारत जोडो” अशा घोषणा देत अधिष्ठाता कार्यालयासमोर आणण्यात आला.
यावेळी दत्ता बारगजे यांनी गणपतराव गेली अनेक वर्षांपासून आनंद ग्राम शी जोडल्या गेले होते. वृध्दापकाळातील आजारांवर त्यांचेवर अनेक वेळा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी गणपतराव यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे मृत्यू नंतर त्यांचा देह स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दान करण्यात आला.
यावेळी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. मुकुंद मोगरीकर, डॉ. कावळे व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आनंद ग्राम च्या वतीने दत्ता बारगजे, आ. डॉ. सौ. नमिता मुंदडा यांच्या वतीने नगर सेवक महादेव आदमाने, अंबाजोगाई आनंदयात्री च्या वतीने अमृत महाजन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने हेमंत धानोरकर, रोटरीच्या वतीने संतोष मोहीते आणि अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी केज येथील पत्रकार गौतम बचुटे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, बीड येथील आनंदयात्री यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


