
प्रा. नरेशकुमार जैस्वाल यांना पीएचडी प्राप्त.
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई संचलित फार्मसी कॉलेज अंबाजोगाई येथील प्रा. नरेशकुमार जैस्वाल यांना मध्यप्रदेश विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. प्रा नरेशकुमार जैस्वाल यांनी मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश. मधून फार्मासुटिकल सायन्स या विषयात पीएचडी मिळवली आहे.
“एनहांसमेंट ऑफ सोलुबीलीटी फोर प्युअरली सोल्यूबल ड्रग्स” हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. या विषयात जैस्वाल यांनी सखोल अभ्यास करून व त्यावर अनेक बाबींवर संशोधन करून आपाला प्रबंध मध्यप्रदेश विद्यापीठास दाखल केला होता. दाखल केलेल्या प्रबंधाचा विचार व अभ्यास करून मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी मध्यप्रदेशच्या वतीने प्रा नरेशकुमार जैस्वाल यांना नुकतीच त्या विष्यायावर पीएचडी प्रदान केली आहे. या पीएचडी साठी त्यांना डॉ. अमित कुमार अग्रवाल यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा नरेशकुमार जैस्वाल यांनी हे यश संपादित केले आहे. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्रा. वसंत चव्हाण, डॉ. डी.एच. थोरात , टी. बी. गिरवलकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, प्रा बिराजदार , प्रा राजमाने सर, प्राचार्य डॉ. संतोष तरके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, मित्र परिवाराच्या वतीने प्रा नरेशकुमार जैस्वाल यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


