आंतरभारती कार्यकर्ता पुरस्कार
यंदाचे मानकरी सिद्धेश्वर स्वामी
अंबाजोगाई प्रतिनिधी
आंतरभारती, आंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार यंदा सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर करण्यात आला.
सिद्धेश्वर स्वामी हे गेली अनेक वर्षे वकील संघाचे काम करतात. हे करीत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची अशनही ते अनेकांच्या मदतीला धावून जातात.
आंतरभारतीच्या आधुनिक तीर्थक्षेत्राना भेटी देण्याच्या अभिनव कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी पाळी येथील दत्ता बारगजे यांच्या प्रकल्पाला भेट दिली. अनाथ, विधवा व दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या लेकरांचे हे मोठे आश्रयस्थान आहे. तेथे स्थानिक मुलामुलींसोबत सहभोजन केले. त्यांना या संस्थेचा दूत म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी झपाटून कार्य केले. कपडे व भाजीपाला तर अनेकदा पाठवला. त्याच बरोबर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आर्थिक मदतीचे त्यांनी आवाहन केले. त्यातून जमा झालेंक्या रकमेत आपलयाकडून काही रकमेची भर घालून ते पैसे त्यांनी इंफॅन्ट इंडियाच्या खात्यावर जमा केले. आंबाजोगाईतील सेवाभावी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सिद्धेश्वर स्वामी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार 12 ऑक्टोबर रोजी डॉ शिरीष खेडगिकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आधार मल्टिस्टेटच्या अजिंठा सभागृहात सायं ठीक 5 वाजता होईल.
*मागचे मानकरी*
शरद लंगे, महावीर भगरे, दत्ता वालेकर, वैजनाथ शेंगुळे, प्रा डॉ अलका वाळचाळे, संतोष मोहिते, राजेंद्र पिंपळगावकर, आदीना या पूर्वी हा पुरस्कार देण्यात आला आहे रोख एक हजार रुपये, शाल, प्रतिमा व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


