अंबाजोगाई

Spread the love

समाजवादी पार्टी चर्मकार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड.शिवाजी कांबळे यांची निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी व महासचिव परवेज सिद्दिकी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रामध्ये चर्मकार चांभार समाजाच्या शौर्याचे प्रतीक असणारा चांभारगड हा किल्ला या किल्ल्यास पर्यटन तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने प्रभावी काम करता यावे म्हणून समाजवादी पार्टी चर्मकार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ऍड.शिवाजी देवाजी कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ऍड.कांबळे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

ऍड.शिवाजी देवाजी कांबळे यांनी समाजवादी पार्टीमध्ये मागील २० वर्षांपासून केज विधानसभा अध्यक्ष म्हणून अतिशय चांगले काम केले. तसेच त्यांनी समाजवादी पार्टीकडून केज विधानसभेचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे. सामाजिक व राजकीय कार्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. एक कुशल संघटक, अभ्यासू वक्ते, समाजवादी पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ही त्यांची सर्वत्र ओळख आहे. सोमनाथ बोरगाव गांवचे सरपंच, अंबाजोगाई वकील संघाचे उपाध्यक्ष, समाजवादी पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व सध्या समाजवादी पार्टीचे प्रदेशसचिव म्हणून काम करीत असणाऱ्या ऍड.शिवाजी कांबळे यांच्या सातत्यपूर्ण कार्याची नोंद व दखल घेऊन चांभारगड या किल्ल्यास पर्यटन क्षेत्र ‘क’ दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्यामुळे ही चर्मकार समाज सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ऍड.कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी दिले. तर महासचिव परवेज सिद्दिकी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवडीचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पी.डी.जोशी पाटोदेकर, प्रदेश महासचिव अंनिस अहमद, प्रदेश महासचिव राहुल गायकवाड, प्रदेश महासचिव मुंबई मेहराज सिद्दिकी, प्रदेश महासचिव शेख रऊफ, शेख अखिल भाई, प्रदेश सचिव गुड्डू ककार, ऍड.रेवण भोसले, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मायाताई चौरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी, रूपेश शेवाळे, कुलदीप, प्रदीप कपिनेयनाथ, राजू यांच्यासह महाराष्ट्रातील व मुंबईतील चर्मकार चांभार समाज बांधवांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!