हल्लेखोरास देशद्रोही घोषित करा, सर्वपक्षीय मागनी,,,
सर न्यायाधीश हल्ला प्रकरणी हाल्ले खोरास देशद्रोही घोषित करा……. सर्व पक्षीयांची मागणी
अंबाजोगाई ————-( प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा अंबाजोगाई बीड जिल्हा येथील सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध……….. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवळी यांच्यावर न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न हा भारतीय लोकशाही वरील हल्ला आणि येथील संविधानातील लोकशाहीची मूल्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय या मूल्यावरच हा हल्ला आहे मानसिक विकृत असलेला किशोर नामक व्यक्तीने चातुरवर्ण व्यवस्था आणि मनुस्मृति ही संविधानाच्या माध्यमातून गाडली गेली होती तिचे अवशेष समाजासमोर आणण्याचा आम्ही सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतोत भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली न्यायव्यवस्था आणि संविधानाने दिलेले अधिकार लोकशाहीचे मूल्य समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय यावर हल्ला आहे न्यायव्यवस्थेच्या मंदिरात मनुवादी विचारसरणीचा हा आतंकवादी चेहरा आहे याला वेळीच ठेचण्याची सर्व भारतीयाची प्राथमिकता आहे हा विकृत मानसिकतेचा किशोर नामक वकील याचे असेल तिथे त्याच तोंड काळे केले पाहिजे त्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये येण्यास बंदी घालून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयाच्या मार्फत सरकारला देण्यात आले या आंदोलनामध्ये भीमशक्ती चे भीमराव सरवदे सुमित आवाडे लोक जनशक्ती पार्टी राजेश वाहुळे विशाल शेवाळे आदित्य चोरे अकबर शेख सूर्यकांत म्हेत्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रमोद दासूद वाघमारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संजय वाघमारे बहुजन समाज पार्टी चे समाधान काळुंके अविनाश शिनगारे यापक्षाच्यासर्व पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि लवकरच रस्ता रोको सर्व पक्षाच्या वतीने करण्यात येईल.


