केज येथे आर.पी.आय.(आंबेडकर) पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
केज प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाचे केज येथील तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि.२५ रोजी करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲड.दीपक भाऊ निकाळजे असून हा पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला आहे.
केज येथील तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा)वायबसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या महिला मराठवाडा अध्यक्ष आम्रपाली गजेशिव,पक्षाचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधव, केज तालुका अध्यक्ष अश्रूबा (दादा) खरात,तालुका संघटक नवनाथ सोनवणे,समाधान खरात,समाधान मस्के,ॲड सोनवने,लक्ष्मण सोनवणे,तरनळी येथील उपसरपंच शिवाजी मोहिते,आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


