*ईद -ए-मिलादून्नबी निमित्त निघालेल्या जुलूस मधील मुस्लिम बांधवांना मिठाई देत राजकिशोर मोदी मित्र मंडळाने जोपासला हिंदू मुस्लिम एकोपा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मुस्लिम धर्म गुरू महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस हा ईद मिलादूनबी म्हणून मुस्लिम बांधव साजरी करतात. ही ईद शुक्रवार दि ५ सप्टेंबर रोजीच झाली . मात्र त्या काळात हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव सुरू होता . त्यामुळेच अंबाजोगाई शहरात मुस्लिम बांधवानी हिंदू मुस्लिम एकतेचे भावना दाखवत ईदच्या दिवशी निघणारा मुस्लिम बांधवांचा जुलूस हा बुधवार दि १० सप्टेंबर रोजी काढण्याचे मुस्लिम बांधवानी ठरवले. त्याप्रमाणे दि १० रोजी अंबाजोगाई शहरात मुस्लिम बांधवानी मोठा जुलूस (मिरवणूक) काढला होता. या जुलूसमध्ये शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
या जुलूसमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिठाई वाटून जोरदार स्वागत केले. जुलूसमध्ये मिठाई देत राजकिशोर मोदी व मित्र मंडळाने हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविले. यावेळी जुलूस मध्ये मोदी यांच्या सोबत बबन लोमटे, शहराध्यक्ष महादेव आदमाणे, धम्मा सरवदे उपाध्यक्ष सय्यद रशीद, खालेद चाऊस, डॉ राजेश इंगोले, पंडित हुलगुंडे, किशोर परदेशी, विजय रापतवार , अंकुश हेडे, सुभाष पाणकोळी,भिमसेन लोमटे, अशोक जेधे, गणेश मसने, शाकेर काझी, जावेद गवळी, सुशील वाघमारे, अकबर पठाण, खलील जाफरी, कैलास कांबळे, दत्ता सरवदे, आकाश कऱ्हाड, विशाल पोटभरे , उज्जेन बनसोडे, शेख अस्लम, रोशन लाड यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
ईद-ए-मिलादुन्नबी हा सण (ईद) मुस्लिम समाजातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण (ईद)आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन शहरात मोठा जुलूस काढण्यात येतो. जागोजागी हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी चहा पाणी, थंड, खिचडी वाटण्यात येते. राजकिशोर मोदी यांनी देखील जुलूसमधील सहभागी असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे पुष्पहार , शाल ,व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत होते. यासोबतच जुलूस मध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवाना मिठाईचे वाटप करून करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधव देखील राजकिशोर मोदी यांना अतिशय आपुलकीने भेटताना दिसत होते. यावरून राजकिशोर मोदी मित्र मंडळाने हिंदू मुस्लिम ऐक्याचे सौदारहय तसेच एकोप्याची परंपरा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.


