अंबाजोगाई

एकतर्फी प्रेमातून मजनूस वीस वर्ष सक्षम तुरुंगवासाची शिक्षा,,,!

Spread the love

एकतर्फी प्रेमातून जबरदस्ती करणाऱ्या मजनूस वीस वर्षे तुरुंगवासाची शिक्षा 

सरकार पक्षाकडून ॲड. लक्ष्मण फड यांनी भक्कमपणे बाजू मांडली.

आंबेजोगाई प्रतिनिधी

एकतर्फी प्रेम करून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या मजनूस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहेरा यांनी वीस वर्ष सक्षम तुरुंगवास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असून सरकार पक्षाकडून ॲड. लक्ष्मण फड यांनी सरकारी पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपीने दिनांक 9 /11/2022 रोजी अल्पाइन मुलगी ती घरी एकटी असताना, घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करीत असताना सदरील पिढीत ही तिच्या आईस जोरात ओरडून हाक मारली असता शेतात काम करणारी तिची आई, घटनास्थळाकडे धावत आली. पिढीतेचे आई घराकडे येत असताना पाहून, आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला. सदरील आशयाची फिर्याद पिढीतेच्या आईने पोलीस ठाणे धारूर येथे गुन्हा र. नं. 270/2022 कलम 376 भा.द.वी. तसेच 4/ 8 /12 बॉक्स विरुद्ध गुन्हा दाखल झाला. सदरील गुन्ह्याचा तपास पी.एस.आय. घोडे यांनी केला. तपासा दरम्यान, तपासी अधिकारी यांनी गुन्ह्यासंबंधी सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षाकडून एक साक्षीदार तपासण्यात आला. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांमध्ये, पीडित मुलीची व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर प्रकरणात सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरून, आरोपीस दोषी धरले व वीस वर्ष सक्षम करावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!