आंबेजोगाईत तरुणाचा खून,,! घटनास्थळी पोलीस दाखल,,,!
आंबेजोगाईत खून,,,????
हॉटेल दरबार मध्ये, तिक्षण हत्याराने वार करून तरुणाचा खूण,,,!
अंबाजोगाई:प्रतिनिधी
शहरातील दरबार हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करत असलेल्या अविनाश देवकर नामक तरुणास अज्ञात आरोपींनी डोक्यात तिक्षण हत्याराने सपासप वार केल्याने तो जाग्यावरच मृत्यू पावला आहे.
अविनाश शंकर देवकर वय 36 राहणार वडारवाडा आंबेजोगाई हा मित्रांसोबत पाण्याची टाकी कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे रात्री साडेआठ वाजता जेवण करत असताना बाजूच्या केबिनमध्ये बसलेल्या इतर दोघांनी त्याच्या केबिनमध्ये येऊन तिक्षण हत्यार काढून डोक्यासह त्याच्या शरीरावर सपासप वार केल्यामुळे तो जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके ,पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, एपीआय कांबळे पोलीस नाईक नागरगोजे,खरटमोल व इतर पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेत देवकर यांचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवला आहे. फोन करून आरोपींनी पोवारा केला असून, खून का,,? झाला,,? कोणी केला,व कशासाठी केला,,,?? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हॉटेल चालक व कामगार या झालेल्या घटनेमुळे हादरून गेले असून तेही याचे कारण सांगू शकले नाहीत.
सोबतच्या मित्रांनीच अज्ञात कारणावरून तिक्षण हत्याराने त्याचा खून करण्यात आला, असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी हे फरार झाले असुन, पोलीस आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
