अंबाजोगाई शहरातील गुणवंतांचा राजकिशोर मोदी यांच्या कडून सन्मान
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई शहरातील डॉ विलास दत्ता जाधव याने NEET PG मध्ये भारतात १७४६ वा रँक तसेच ८०० पैकी ६१५ गुण मिळवत एमबीबीएस नंतरच्या PG साठीच्या प्रवेशास पात्र ठरल्यामुळे तसेच कु. रूपाली शंकर पळसे हिने देखील NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केल्याबद्दल, त्याचबरोबर अंबाजोगाई शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी निलेश मुथा यांची सुकन्या कु साक्षी हिने BDS च्या पहिल्या राऊंडमध्येच नाशिक येथील डेंटल कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. याबद्दल या तीनही गुणवंतांचा फेटा बांधून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी राजकिशोर मोदी यांच्या सोबत शहरातील जेष्ठ नागरिक तसेच विविध चळवळीतील अग्रणी माणिकभाऊ कदम , दत्ता जाधव,निलेश मुथा सय्यद ताहेर, रशीद भाई, विजय कोंबडे , कु रुपालीची आई या उपस्थित होत्या.
या सन्मान सोहळ्या प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी सर्व गुणवंतांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीतही कु रुपाली पळसे हिने अत्यंत जिद्दीने व चिकाटीने आपले शिक्षण घेतले . आज अंबाजोगाई शहरातीलच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या सा प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल कु रुपलीचे विशेष असे कौतुक केले
शहरात सूप व दुरडी बनवण्याचा आपला पारंपरिक व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करणारे शंकर पळसे याची कन्या कु रुपाली ही अंबाजोगाई शहरातील बुरुड समाजातील पहिली डॉक्टर होण्याचा सन्मान मिळवणार आहे. त्याबद्दल संपूर्ण समाजातून देखील तिच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. चि विलास जाधव यांच्या कुटुंबात याअगोदर देखील डॉक्टर बनले आहेत. त्याने बी जे मेडिकल कॉलेज मधून आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले आहे . त्यांच्या कुटुंबात डॉक्टर बनण्याची परंपरा पुढे डॉ विलास याने सुरू ठेवली आहे. मुथा कुटुंब हे अंबाजोगाई तालुक्यातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे. त्याची कन्या कु साक्षी हिने दंतवैद्यक शास्त्रात पहिल्या वर्षासाठी पहिल्याच फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. या कौतुक सोहळ्यात उपस्थित असलेले जेष्ठ नागरिक माणिक भाऊ कदम यांनी देखील या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या तिनही विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीने हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळं केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसर व समाज अभिमानाने उंचावला असल्याची भावना राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी देखील घेऊन आपल्या कुटुंबासह संपूर्ण समाजाचे नाव उज्वल करावे असे आवाहन देखील इतर विद्यार्थ्यांना राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी केले आहे.
