*
शाळकरी मुलांनी केला बैलपोळा सण उत्साहात साजरा ; सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूर*
बर्दापूर प्रतिनिधी, आज 21 ऑगस्ट रोजी, मातीपासून बैल बनवणे हा उपक्रम सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आला या मध्ये विद्यार्थांसोबत शिक्षकांनी व इतर कर्मचारी यांनी सक्रिय भाग घेतला व मुलांना बैल कसा तयार करतात व त्याचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी बैलपोळा हा सण महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून, त्यांची पूजा केली जाते. बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला (पिठोरी अमावस्या) साजरा केला जातो. बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा सण आहे. कारण, शेतीमध्ये बैलांचे अनमोल योगदान असते.
या दिवशी बैलांना छान सजवतात, त्यांची पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य दाखवतात.
शिंगे रंगवून, नवीन वेशभूषा करून सजवतात. त्यांना हार, माळा घालतात. बैलांना पुरणपोळी, लाडू, शेंगा, पालेभाजी असे नैवेद्य खायला देतात. बैलांची गावात मिरवणूक काढली जाते. हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या कष्टांची जाणीव करून देण्याचा दिवस आहे अशाप्रकारे शाळेचे मुख्याध्यापक मधुकर जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
मुख्याध्यापक मधुकर जाधव सर, अमोल भडके सर, संगीता धुमाळ मॅडम, निकिता शिंपले मॅडम, जना माने मॅडम, सुनीता सोनवणे मॅडम, समिना अत्तार मॅडम, सानिया शेख मॅडम, अर्पिता कुलकर्णी मॅडम, पंकजा पवार मॅडम
