परळी वैजनाथ

Spread the love

 

कोयत्याने सपासप वार करून भीमराव राठोड ची हत्या,,,!

आरोपी अनिल चव्हाण फरार

परळी प्रतिनिधी

परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची प्रेमप्रकरणाच्या संशयावरून कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटनास्थळावरून अद्याप फरार आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद सुरू होता. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि यावरून अनिल चव्हाणने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांड्यात बोलावले. या भेटीत दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला. बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारीदरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले. यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!