*
ममत्वाचा आणि चार पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या आई सुशीलाबाई मोहनलाल लखेरा यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस.*
‘ आई ‘ या दोन शब्दात जग सामावले आहे. कारण एवढं ममत्व, एवढी माया, एवढं प्रेम,एवढा जिव्हाळा, एवढ वात्सल्य किंवा एवढा दयाळू कुठेही सापडत नाही. शिवाय कधी द्वेष नाही, कधी मत्सर नाही,कधी आकस नाही,कधी नकार नाही, कधी आळस नाही, कधी आराम नाही,सदैव तत्पर आणि सदैव उत्साही असणारी व्यक्ती म्हणजे आईच. आई म्हणजे देव आणि आई म्हणजेच संपूर्ण विश्व. एवढी ताकद दुसऱ्या कुठल्याही नात्यात नक्कीच नाही. अशा या महाकाय नात्यातील दुवा म्हणजे आई. आज आमचे मोठे बंधू मनोज भैया लखेरा यांच्या आई श्रीमती सुशिलाबाई मोहनलाल लखेरा यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वार्ता समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आई श्रीमती सुशिलाबाई मोहनलाल लखेरा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लखेरा कुटुंबीयाला एक संघ ठेवण्यात यश मिळवले. तसे पाहिले तर मुळात हे चार भाऊ. चौघांमध्ये प्रचंड समन्वय आणि आपलेपणा होता. एक संघ कुटुंब हे प्रचंड ताकदवाद आणि तेवढेच लवचिक सुद्धा.या कुटुंबात आईचा प्रवेश झाला. आईने पुन्हा या कुटुंबाला अधिक घट्ट राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या चार भावंडांना 11 मुले आणि 13 मुली झाल्या एवढा मोठा विस्तार झाल्या तरी पण नात्यातील तणाव कधी वाढू दिला नाही. हा परिवार अधिक घट्ट होत गेला कारण चारही भावंडांनी व बाहेरून आलेल्या मावल्यानी ही रेशीमगाठ मजबूत राहण्यासाठी परिश्रम घेतले. त्यापैकी श्रीमती सुशीलाबाई मोहन लाल लखेरा यांचा समावेश आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. त्यापैकी मनोज भाऊ व संजय लखेरा आणि दोन भगिनी सौ.सुनीताताई(गुजरात )व श्रीमती नवनिताताई असा त्यांचा परिवार आहे.चारही मुलांचे संसार आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यांचे नातू सुद्धा चांगल्या पदावर व प्रतिष्ठेवर कार्यरत आहेत. आई श्रीमती सुशिलाबाई यांनी कुटुंबातील सर्व मुलांना चांगले संस्कार देऊन माणूस म्हणून घडवण्याचे काम केले. समाजात दररोज कितीतरी जन्मतात व निघून जातात मात्र त्यात माणूस म्हणून खूप कमी जन्माला येतात. त्यापैकी लखेरा कुटुंबातील प्रत्येक सदस्य माणूस म्हणून जन्माला आला आहे .मनोज भाऊ लखेरा हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व. जे संस्कार त्यांच्यावर रुजले त्यांनी प्रत्येकाला सर्व धर्म समभाव मानून त्यांनी काम केले. समाजकारण, राजकारण व व्यवसायात ते लौकिक पात्र ठरले. त्यांची दोन्ही मुले ही यशस्वी ठरली आहेत तसेच संजय यांची मुले आणि बहिणी सौ.सुनिताताई व श्रीमती नवनीताताई यांची मुले चांगले काम करत आहेत.आई म्हणून श्रीमती सुशीलाबाई मोहनलाल लखेरा यांनी मंगळवार पेठ येथे उत्कृष्ट कार्य केले आहे. मुळात लखेरा परिवार हा व्यवसायात रमलेला परिवार आहे. गेली कित्येक दशके या परिवाराने अंबाजोगाईकरांची सेवा केलेली आहे. मुद्रणालय क्षेत्रात या परिवाराचा दबदबा होता. त्या काळातील जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम लखेरा परिवाराच्या योगदानाशिवाय यशस्वी झालेले नाहीत. लखेरा परिवार आणि अंबाजोगाईचे नाते दृढ राहिलेले आहे. राजकारणात प्रामुख्याने स्व.शिवनारायणजी लखेरा यांच्या माध्यमातून समाजातील पहिले नगराध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर स्व.नंदकिशोर लखेरा उपनगराध्यक्ष झाले आणि त्या पिढीनंतर प्रामुख्याने मनोजभैय्या लखेरा हे उपनगराध्यक्ष झाले. गेल्या बावीस वर्षापासून ते अंबाजोगाई शहरात नगरसेवक म्हणून सक्रिय आहेत. आई म्हणून श्रीमती सुशिलाबाई लखेरा यांनी लखेरा परिवारातील सर्व मुलांना शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर प्रकारचे आकलन करून देण्याचे काम केले.आज कुटुंब व एकसंघ ठेवणे आव्हान होऊन बसले आहे. मात्र आई सुशिलाबाईंनी त्या काळात मी आणि माझा परिवार ही ओवी गायली नाही म्हणून ही नात्याची लकेर अधिक घट्ट बनली. नात्यांमध्ये मी पणा सोडला की सगळ्या गाठी या अधिक घट्ट बनतात. आईंनी व सर्व मावल्यानी लखेरा परिवाराला एक संघ ठेवण्याचे काम केले. मनोज भाऊ, संजय, सौ.सुनिताताई व नवनिताताई यांनी सुद्धा आपले भावंड हे कसे मोठे होतील यासाठी प्रयत्न केले. त्यांनी कधी तणाव निर्माण होऊ दिला नाही. उलट सर्वांनी एकमेकांना बळ देत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.पदाचा, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. छोट्यांनी मोठ्यांना मान दिला की, छोटे सुद्धा मोठे होतात. तसे आज या घरात मनाने व कर्तुत्वाने मोठे आहेत. या यशाचे गमक म्हणजे आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे मानले जातात.आईचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लखेरा परिवारास लाभत आहे.कारण आज नात्यांमध्ये प्रचंड तणाव आणि अंतर आहे. पण अपत्य चांगले आणि सुसंस्कारित असतील तर त्या कुटुंबाचा झेंडा गगनाला गवसनी घालत असतो.
मनोज भाऊ आपल्या आईचा 75 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांना ते भाग्य लाभले आहे. ज्या आईने हाताला धरून ही दुनिया दाखवली त्याच आईची कृतज्ञता या निमित्ताने साजरी केली जात आहे. आईचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे परम भाग्य त्यांना लाभले आहे.आईचा शतकी वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आपणास व सर्व लखेरा कुटुंबियांना लाभो हीच त्या विधाताकडे प्रार्थना असेल. आजच्या वाढदिवसाच्या दिनी जवळपास चार ते पाच पिढीचा संगम एकत्र होत आहे. आपल्या आईचा, आजीचा, मामीचा, आत्याचा व नात्याची गुंफण एकत्र असलेला वाढदिवस साजरा केला जात आहे. आईला पुजणे आणि तिची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे.आईंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.वार्ता समूहाने सुद्धा आजपर्यंत आई हे सर्वस्व मानून आपले कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आई सुशीलाबाई मोहनलाल लखेरा यांचा 75 वा वाढदिवस होतो आहे ही आमच्यासाठी सुद्धा भाग्याचा क्षण आहे.
