*
सरस्वतीन्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूर येथे दहीहंडी उत्सव साजरा*
बर्दापूर प्रतिनिधी, आज, 16 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याचप्रमाणे सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे गोपाळकाला (दहीहंडी) साजरी करण्यात आली. गोविंदानी दहीहंडी फोडण्यासाठी शाळेच्या मैदानावर एकत्रित येऊन उत्साहाने हा सण साजरा केला.
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित उत्सव आहे हा उत्सव महाराष्ट्रात विशेषतः उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो असे शाळेचे मुख्याध्यापक मधुकर जाधव यांनी सांगितले. तसेच गोविंदा पथकं मानवी मनोरा बनवून दहीहंडी फोडण्यात आली याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून मनसोक्त आनंद घेतला. यावेळी,मुख्याध्यापक मधुकर जाधव सर, राहुल यादव सर, अमोल भडके सर, संगीता धुमाळ मॅडम, निकिता शिंपले मॅडम, जना माने मॅडम, सुनीता सोनवणे मॅडम, समिना अत्तार मॅडम, सानिया शेख मॅडम, अर्पिता कुलकर्णी मॅडम, पंकजा पवार मॅडम आवर्जून उपस्थित होते.
