आंबेजोगाई पोलिसांची मटका, जुगार अड्ड्यावर धाड, मुद्देमाल व साहित्य जप्त,,!
आंबेजोगाई पोलिसांची मटका ,जुगार अड्ड्यावर धाड, साहित्य व मुद्देमाल जप्त,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
दिनांक 19 /8/ 2025 रोजी माननीय श्री ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग आंबेजोगाई यांचे आदेशावरून आंबेजोगाई शहरांमध्ये अवैधरित्या मटका जुगार खेळणारे व खेळीविणारे इसमानवर जुगार रेड करण्याचे आदेश दिल्याने, गोपनीय माहितीवरून आंबेजोगाई शहरांमध्ये जुगार रेड केली असता,1 राहुल गायकवाड 2.असलम मोहीम शेख 3.महेश शिवराम घुले 4.सोमनाथ सुदाम पवार व बुक्की मालक, 5.चांद गवळी, 6.गणेश नागरगोजे, 7.अन्वर सय्यद सर्व राहणार आंबेजोगाई यांच्यावर जुगार रेड करून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य व नगदी पैसे 60790 /- रुपयांचा माल मिळून आल्याने, त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन आंबेजोगाई शहर येथे कलम 12 (अ ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही ही माननीय नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक आंबेजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक आंबेजोगाई पोलीस उपनिरीक्षक संजय फड, महादेव आवले, मुकेश खरटमोल, अशोक खेलबुडे नेमणूक उपविभागी पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग आंबेजोगाई व पोलीस कर्मचारी हनुमान चादर ,भागवत नागरगोजे नेमणूक आंबेजोगाई शहर यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार विजयकुमार गायकवाड हे करीत आहेत.
