दै. लोकनायकचे व्यवस्थापक ॲड. अक्षय मुळे यांच्यासह बसपा जिल्हाध्यक्ष विशाल साबळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश ,,,!
काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे : खासदार सौ.रजनीताई पाटील,,,!
केज (प्रतिनिधी)
केज शहरात झालेल्या भव्य कार्यक्रमात दैनिक लोकनायकचे व्यवस्थापक एडवोकेट अक्षय मुळे तसेच बहुजन समाज पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साबळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले हा प्रवेश सोहळा खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या राज्यसभा खासदार सव रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्री आदित्य दादा पाटील जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे प्रदीप भाऊ शेख पशु पथनात दांगट बाळासाहेब ठोंबरे मुन्ना ठोंबरे गणेश बुजगुडे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आकाश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत दैनिक लोकनायकचे व्यवस्थापक एडवोकेट अक्षय मुळे बसपाचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साबळे संकेत साबळे रवी साबळे प्रवीण खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केज येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला खासदार सौ रजनीताई पाटील म्हणाल्या की काँग्रेस पक्ष हा सामाजिक न्याय समता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारा पक्ष आहे युवा व सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षावर वाढता विश्वास हीच खरी ताकद आहे काँग्रेस पक्षाचे जनसामान्यांमध्ये विश्वास हरता आहे सामान्य माणसाच्या हितासाठी लढणारा अपक्ष आहे काँग्रेसची विचारधारा ही सामान्यांच्या हिताची आहे सर्व जाती धर्म पंथाचा काँग्रेसवर विश्वास आहे यामुळे पक्षाचा व्यापकता अजून वाढत आहे येणाऱ्या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढत आहे जनता काँग्रेसच्या सोबत येणार आहे या पुढील काळात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाहीचा विजय निश्चित होईल असे मत यावेळी खासदार संरज्ञताई पाटील यांनी व्यक्त केले
” पक्षाशी एकनिष्ठ असणारे नेतृत्व खासदार सौ.रजनीताई पाटील आहेत या नेतृत्वावरील श्वास ठेवूनच बहुजन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल साबळे दैनिक लोकनायक व्यवस्थापक एडवोकेट अक्षय मुळे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला काँग्रेस हा बहुजनवादी विचाराचा पक्ष आहे खासदार रजनीताई पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रवेश केला असल्याचे एडवोकेट अक्षय मुळे यांनी सांगितले काँग्रेसमध्ये दाखल होताना एडवोकेट अक्षय मुळे यांनी सांगितले की दैनिक लोकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रश्न मांडत आलो आहोत आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे”
हाताच्या पंजाकडे कार्यकर्त्यांचा ओढा : राहुल सोनवणे
जिल्ह्यात देशाचे गढूळ वातावरण साचले होते त्यावेळी सद्भावना निर्माण व्हावी ही विश्वासहारता काँग्रेसने जपल्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा काँग्रेसकडे येत आहे
बसपाचे जिल्हाध्यक्ष विशाल साबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले की बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काँग्रेसने नेहमीच भरीव काम केले आहे वंचित घटकांसाठी काँग्रेस हा असेचा किरण आहे त्यामुळे आम्ही पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात स्वागत केले प्रवेश कार्यक्रमास कार्यकर्ते मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
