एस. पी. यांच्या विरोधात माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या आंदोलन,,,!
गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या एस.पीं.च्या निषेधात माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे आंदोलन
बीड प्रतिनिधी – 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी, माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखा निषेध नोंदवला. त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधीक्षकाचा फोटो गळ्यात अडकवून निषेध केला. यावेळी त्यांची पत्नीही उपोषणात सहभागी झाल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून विविध पद्धतींनी आंदोलन करण्यात येत असूनही न्याय न मिळाल्यामुळे वाघमारे यांनी हे पाऊल उचलले आहे. बीड तालुक्यातील शिवनी येथील गट नंबर 662 या ठिकाणी ते गायरान शेती करत आहेत आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अन्नधान्य पिकवून होतो.
अलीकडे त्यांच्या घरातील शेड पाडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची घटना घडली आणि याबाबत संबंधित आरोपींवर कारवाई नाही झाल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी वाघमारे यांनी हा उपाय केला. मारहाणीचे व्हिडिओ उपलब्ध असूनही कारवाई न झाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षकांचा फोटो गळ्यात घालून न्यायाची मागणी केली.
या घटनेद्वारे त्यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
