आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश,,,!
आडस, होळ, बनसारोळा ,युसुफ वडगाव, चनई मोरेवाडी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसह नागरी सुविधा कक्ष मंजूर****
***********************
आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
आंबेजोगाई प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागातील प्रशासनाला आधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने 500 नव्या ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या यादीत केज विधानसभा मतदारसंघातील आडस होळ वंसारोळा येसूप वडगाव चनई आणि मोरेवाडी या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून. शासनाच्या या निर्णयामुळे या भागातील ग्रामपंचायतींना सुसज्ज व आधुनिक पायाभूत सुविधा मिळणार आहेत. पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामविकास अभियान अंतर्गत सन 2025 26 या आर्थिक वर्षात ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या योजनेतून नव्या ग्रामपंचायत इमारतींसोबत नागरी सुविधा कक्षाची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणी नागरिकांना जन्म मृत्यू दाखले जात प्रमाणपत्रे पाणी बिल भरणा निवडणूक ओळखपत्र संदर्भातील सेवा आदी अनेक शासकीय सेवा मिळणार आहेत. त्यामुळे गावातील प्रशासन अधिक कार्यक्षम अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख होणार आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण अनुक्रमे 60 टक्के व 40% असे राहणार आहे यातून ग्रामपंचायती इमारतीसाठी वीस लाख रुपये आणि नागरी सुविधा खोलीसाठी पाच लाख रुपये असा एकूण 25 लाखांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मंजूर करण्यात आला आहे सदर निर्णयामुळे या गावातील प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणारा असून डिजिटल सेवांचा ग्रामीण भागात प्रसार होणार आहे स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठी दिलासादायक सुरुवात ठरणार आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
