गुरु आऊटडोअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. अक्षय विशंभर मुळे यांची निवड
गुरु आऊटडोअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कायदेशीर सल्लागार म्हणून : ॲड. अक्षय विश्वंभर मुळे
छत्रपती संभाजीनगर – गुरु आऊटडोअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Guru Outdoors India Pvt. Ltd.) या जाहिरात क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज अॅड. अक्षय विश्वंभर मुळे (Adv. Akshay Vishwambhar Mule) यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचा औपचारिक करार आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी करण्यात आला आहे.
या करारानुसार, अॅड. मुळे हे कंपनीसाठी विविध कायदेशीर सेवा प्रदान करणार असून, करारनाम्यांचे ड्राफ्टिंग, कायदेशीर सल्ला, न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजात प्रतिनिधित्व आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.
कंपनीने व्यवसायातील गोपनीयता व हितरक्षणासाठी कडक अटी ठरवल्या आहेत.तसेच सर्व अधिकृत संवाद फक्त लिखित स्वरूपात (ई-मेल किंवा पत्राद्वारे) होणार आहे.
या करारामुळे कंपनीला व्यावसायिक गोपनीयतेचे संरक्षण व कायदेशीर बाबतीत सक्षम मदत मिळणार आहे. अॅड. मुळे हे बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असून, त्यांनी विविध न्यायालयीन प्रकरणांत यशस्वी कामगिरी बजावली आहे.
