शहरातील पुरातन विहीर वाचली पाहिजे : लोक जनशक्ती पार्टी, आंबेजोगाई
अंबाजोगाई शहरातील पुरातन विहीर वाचली पाहिजे….. लोक जनशक्ती पार्टी
अंबाजोगाई :
अंबाजोगाई शहरात सध्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बँकेसमोरील पुरातत्त्व विभागाच्या विहिरीवर नगरपालिका प्रशासनाने केलेल्या नियमबाह्य अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी आंदोलने सुरू आहे त्यातील पहिला टप्पा हा बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुरू करण्यात आला त्याच्याच पुढे अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी मुख्याधिकारी अंबाजोगाई यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली तरीही विहिरीवर केलेले अतिक्रमण निगरगट्ट प्रशासन काढण्यास तयार होत नाही हे आंदोलकांच्या लक्षात आल्यावर अंबाजोगाई नगरपरिषदेवर सर्वपक्षीयांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला त्यालाही प्रशासनाने दात दिली नाही निवेदन कर्त्यांना पूर्व उडवींची उत्तरे देण्यात आली आणि लेखी स्वरूपात नगर परिषदेचा महसूल वाढण्यासाठी ही जागा अधिग्रहण करण्यात आली आहे असे पत्र दिले परंतु आंदोलनकर्त्यांचे याच्यावर समाधान झाले नाही म्हणून आंदोलनकर्त्यांनी भीक मागून आंदोलन करून अंबाजोगाई नगर परिषदेला पंधरा हजार पाचशे त्रेपन्न रुपये 50 पैसे निषेध म्हणून दिले तरीही संबंधित विहिरीवरील अतिक्रमण निघाले नाही विशेष करून या दुकानात मोठे किराणा होलसेल दुकान टाकले अंबाजोगाई शहरामध्ये असे शेकडो भूखंड आहेत की ते हातावर पोट भरणाऱ्या लोकांना देता आले असते परंतु निगरगट्ट प्रशासनाने हे भूखंड आपल्या मर्जीतील काही लोकांना कमी किमतीमध्ये देऊन नगरपालिकेची लूट सुरू केलेली आहे गरिबांना एक आणि श्रीमंतांना एक न्याय अशी भूमिका अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रशासनाची झाली आहे त्यामुळे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात दिनांक 30 7 2025 पासून आमरण उपोषणास बसण्यात आले आहे
……..उपोषण करते :
अशोक काळे (पाटील)
लोक जनशक्ती पार्टी युवा बीड जिल्हा अध्यक्ष
