जमीन खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा डॉ. राजेश इंगोले
जमीन खरेदी – विक्री प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा – डॉ.राजेश इंगोले*
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जमीन किंवा प्लॉट खरेदी – विक्री प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्वरित योग्य त्या कागदपत्र व पुराव्यांसकट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.राजेश इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
अंबाजोगाई व परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीच्या प्लॉटच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे तसेच जमिनीच्या प्लॉटच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत.सर्वसामान्य जनतेच्या मनात आपलं एक हक्काचं घर असावं, ते स्वस्तात मिळाव या मानसिकतेचा फायदा घेऊन काही बोगस दलालांनी, सर्वसामान्य माणसाच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन अत्यल्प दरामध्ये जमिनी प्लॉट तुम्हाला खरेदी देतो करून देतो असे सांगून अनेक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केलेली आहे. यामध्ये एकाच प्लॉटची अनेक जणांना विक्री केली आहे. काही ठिकाणी प्लॉट मालकांनीच एजंट लोकांना हाताशी धरून त्यांच्या नांवे वेगवेगळ्या एजंट मार्फत त्यांच्या प्लॉटच्या अनेक जणांकडून इसार घेतलेला आहे व लोकांची फसवणूक केलेली आहे. रजिस्ट्री ऑफिसमध्ये ही एकाच प्लॉटच्या दोन – दोन रजिस्ट्री झालेले आहेत तसे पुरावे माझ्याकडे आलेले आहेत हे सर्व पुरावे घेऊन लवकरच आता बीड चेक कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना भेटणार असल्याचे डॉ.इंगोले यांनी यावेळी जाहीर केले. बीड पोलीस कार्यालयातर्फे अंबाजोगाई उपविभाग येथे जनसंवाद बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये अंबाजोगाईचे माजी शिक्षण सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेश इंगोले यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांना अंबाजोगाई मध्ये जमीन व प्लॉट विक्री खरेदी संदर्भात अनेक बोगस रजिस्ट्री होत आहेत. एकाच प्लॉटची अनेक जणांना विक्री करून फसवणूक होत आहे. यामध्ये अनेक टोळ्यांचे लोक एकत्र येऊन सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत. अनेक खोटे पुरावे, ग्रामपंचायतीचे दाखले, सही, शिक्के, बोगस आधारकार्ड तयार करून जमिनीचे खरेदी विक्री बिनदिक्कत करीत आहेत. त्या संबंधीचे पुरावे कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे पोलीस अधीक्षक कांवत साहेबांना सांगितले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी आपल्या भाषणामध्ये या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करीत डॉ.इंगोले यांनी नमूद केलेली माहिती ही गंभीर स्वरूपाची आहे, अशी बोगस कागदपत्रे, ओळखपत्रे तयार करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असे सांगत डॉ.इंगोले यांना तुम्ही सर्व पुरावे घेऊन बीड येथे या आरोपींवर कडक व कायदेशीर कार्यवाही आपण करू असे आश्वासन या जनसंवाद मेळाव्यामध्ये दिले होते. संदर्भीय अनुषंगाने डॉ.इंगोले यांनी अशा बोगस जमीन खरेदी – विक्री प्रकरणात अनेक दस्ताऐवज व पुरावे गोळा केलेले आहेत ते दस्तऐवज घेऊन लवकरच बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याचे डॉ.इंगोले यांनी जाहीर केलेले आहे. अंबाजोगाई मध्ये अशा फसवणूक झालेल्या सर्वसामान्य जनतेने न घाबरता समोर येऊन आपली झालेली फसवणूक , कैफियत मांडावी व फसवणुकीचे पुरावे आपल्याकडे द्यावेत, जनतेची बाजू पोलीस अधीक्षकांकडे मांडून फसवणूक झालेल्या सर्वसामान्य जनतेचे न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे डॉ.इंगोले यांनी यावेळी सांगितले आहे. तरी अशा खरेदी – विक्री प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांनी पुरावे घेऊन येणाऱ्या त्वरित समाधान रूग्णालय, हाऊसिंग सोसायटी पंचायत समिती जवळ येऊन डॉ.इंगोले यांना भेटावे तसेच संपर्कासाठी (९४२२२४०७१०) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी केले.
