प्राचार्य डॉ. बी. आय.खडकभावी, रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित,,,!
प्राचार्य डॉक्टर बी आय खडकभावी रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आय खडक भावी यांना रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिला. जाणारा रोटरी भूषण पुरस्कार, शुक्रवार दिनांक 25 रोजी सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल परिचय येथे भव्य दिव्य समारंभात प्रदान करण्यात आला. शाल ,श्रीफळ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह अशा प्रकारचे पुरस्काराचे स्वरूप होते .
या पुरस्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे भावी प्रांतपाल जयेश पटेल, उपप्रांतपाल प्रवीण देशपांडे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्राध्यापक रोहिणी पाठक सचिव मंजुषा जोशी, माजी अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, सौ शोभा खडकवावी, पारुल पटेल, शर्मिला देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर बी आय खडक भावी यांचा यतोचित सन्मान करून, त्यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना जयेश पटेल म्हणाले की, प्राचार्य डॉक्टर बी आय खडक भावी हे आंबेजोगाई शहरात गेल्या 40 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी अभियंता म्हणून घडवले असून,आज देश व विदेश पातळीवर त्यांचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रोटरीने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त ्वाला व त्यांच्या कार्याला उजाळा देऊन, खडक भाऊ यांचे दिशादर्शक काम समाजासमोर आणले आहे.यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉक्टर बी आय खडक भावी म्हणतात, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. या दृष्टिकोनातूनच मी हे कार्य सुरू केले मात्र आजही बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा स्थितीत या मुलांच्या शिक्षणासाठी काय करता येईल यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या 40 वर्षात ,आंबेजोगाई करांनी मला जे प्रेम दिले ते मी कधीही विसरणार नाही असे सांगून ते खूप भावनिक झाले होते. आंबेजोगाई करांच्या पाठबळावरच आजही माझी वाटचाल सुरू असल्याचे खडकवावी यांनी व्यक्त केले.
