मृतदेहावर झाले राजकिशोर मोदी यांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्कार,,,!
लिंगायत समाज स्मशान भुमिच्या जागेसाठी मृतदेह नगर परिषद कार्यालयत आणून अंदोलन*
*राजकिशोर मोदी यांच्या मध्यस्थीने मृतदेहावर झाले अंत्यसंस्कार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) :- अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधी साठीची जागा सकलेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्यामुळे सध्या समाजास अंत्यविधी साठी जागाच उपलब्ध नसल्याने अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांचा मृतदेह अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात आणून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बराच वेळ समाजाच्या वतीने स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी येथे येऊन आंदोलन कर्त्या समाजबांधवांची भेट घेतली. याप्रश्नी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून याप्रश्नी दोन दिवसात तोडगा काढला जाईल असे सांगितले. राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्या समाजाने ते करत असलेले आंदोलन स्थगित करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभुमि शहरालगत असलेल्या बाराखांबी परिसरात आहे .मात्र तेथील जागा पुरातत्व खात्याने सदर जागा उत्खननासाठी ताब्यात घेऊन अतिक्रमित केली आहे . त्यामुळे स्थानिक लिंगायत समाजबांधव यांच्या अंत्यविधी साठी जागाच शिल्लक राहिली नाही . आज ज्या जागेवर अंत्यविधी केला जात होता यावेळी विभागाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे सदर बांधवानी तो मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयात आणून येथील प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. समाजास दिलेल्या जागेसंदर्भात अंबाजोगाई नगर परिषद, भूमी अभिलेख कार्यालय व पुरातन विभाग यांच्याकडूनच समाजबांधवांची दिशाभूल केली जात असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्या समाजबांधवानी सांगितले.
मात्र राजकिशोर मोदी यांनी यावेळी प्रसंगाचे गंभीर्य लक्षात घेऊन आंदोलन स्थळी भेट दिली. लिंगायत समाजाचे म्हणणे ऐकून घेऊन तात्काळ उपजिल्हाधिकारी , मुख्याधिकारी तसेच नगर परिषदेचे अधीक्षक यांच्याशी फोनवर चर्चा करून आंदोलन कर्त्या समाजाशी संवाद साधला व येत्या दोन दिवसात स्मशानभूमीच्या जागेसंदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा शब्द दिल्याने अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयातुन मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी करण्यात आला. बराच वेळ नगर परिषदेचा कोणताही कर्मचारी आंदोलन स्थळी न आल्याने लिंगायत समाजाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला व राजकिशोर मोदी यांनी समाजाची भेट घेऊन मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवून स्मशानभूमीच्या जागे संदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीने राजकिशोर मोदी यांना धन्यवाद दिले.
