उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन: डॉ. राजेश इंगोले यांची माहिती
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन – डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*
*~ गरजूंनी लाभ घ्यावा आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाचे आवाहन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. तर आरोग्य तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांच्या समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भव्य मोफत व्यसनमुक्ती शिबीर, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीर, मतिमंदत्व तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर, पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १५ जुलै रोजी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. २२ जुलै रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अंबाजोगाईत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात भव्य मोफत व्यसनमुक्ती शिबीर, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीर, मतिमंदत्व तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर, पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. तर आरोग्य तपासणी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील शिबिरात तपासणी करीता नांवनोंदणी करणे आवश्यक आहे. तरी पुर्व नांवनोंदणी करण्यासाठी तसेच ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. अशा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी पुढील मोबाईल (नंबर – 9529893030) संपर्क साधावा असे आवाहन आयोजक राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
