सात दिवस सात उपक्रम अभियानात आंबेजोगाई बस स्थानकाची साफसफाई
*सात दिवस सात उपक्रम अभियानात अंबाजोगाई बस स्थानक व परिसराची साफसफाई*
अंबाजोगाई :- सात दिवस सात उपक्रम हे अभियान राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सेवा सप्ताह राबवले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या पुढाकारातून हा सेवा सप्ताह उपक्रम राबविण्यात येत आहे. दि १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान या सप्ताहात प्रारंभी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यामध्ये ६३रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण आयोजित करून त्यात विविध झाडांचे वृक्षारोपण मोदी लर्निंग सेंटरच्या प्रांगणात करण्यात आले तर तिसऱ्या दिवशी दिव्यांग, मतिमंद शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर दि १८ गुरुवारी चौथ्या दिवशी सकाळी स्वच्छता मोहीम राबविताना अंबाजोगाई बस स्थानक व परिसराची साफसफाई राजकिशोर मोदी व त्याच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी संपुर्ण बस स्थानक झाडून स्वछ धुवून घेण्यात आले. यामुळे बस स्थानकाचा संपूर्ण परिसर एकदम स्वच्छ व सुंदर दिसत होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी तसेंच बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने १५ ते २२ जुलै दरम्यान सात दिवस सात उपक्रम या संकल्पनेवर आधारित अंबाजोगाई शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आरोग्य, पर्यावरण,स्वच्छता, शिक्षण तथा सामाजिक जनजागृती यावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापुढेही संपूर्ण सप्ताहभर अशाच विधायक उपक्रमांची नागरिकांना मेजवानी असणार आहे.
स्वच्छता अभियान अंतर्गत अंबाजोगाई बस स्थानक परिसर साफसफाई करतांना मनोज लखेरा,बबन लोमटे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले,महादेव आदमाने, अमोल लोमटे, धम्मा सरवदे, कचरू सारडा, किशोर परदेशी, सुनील वाघळकर, अंकुश हेडे, जावेद गवळी, जमदार पठाण, पंडित हुलगुंडे, भीमसेन लोमटे, सुभाष पाणकोळी, सुधाकर टेकाळे, खलील जाफरी, रशीद भाई, विश्वजित शिंदे, दत्ता सरवदे, सुदाम देवकर, सय्यद ताहेर,रोहन कुरे, अकबर पठाण, विशाल पोटभरे , दौलत पठाण, वजीर शेख, अस्लम शेख, शरद काळे, शुभम पवार, प्रसाद पवार यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
