कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर वर आंबेजोगाई वाहतूक पोलिसांचे बुलडोझर,,! पोलिसांचे बुलडोझर
*
कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर वर अंबाजोगाई वाहतूक शाखेचे बुलडोजर*
अंबाजोगाई( प्रतिनिधी)
अंबाजोगाई वाहनधारकांच्या कर्कश्य सायलंसरच्या आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरीक त्रास झाले होते याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पीआय शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाने वाहतूक पोलिसांच्या पथकाने आज गुरुवार दि 17 रोजी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 30 बुलेट सायलेन्सर वर बुलडोझर फिरवण्यात आले .
मागील कित्येक महिन्यापासून अंबाजोगाई शहरात कर्णकर्कश हॉर्न, लावून बुलेट अती आवाजाने नागरिक पूर्ण त्रस्त झाले होते. काही हृदय रोगी वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत. सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे माध्यमांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईत संवाद बैठक घेतल्यानंतर अंबाजोगाई येथील वाहतूक शाखेच्या पथकाला सूचना केल्या कर्कश्य आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी व त्या बुलेटचे सायलेन्सर काढून पोलीस स्टेशनला जमा करण्यात यावे ते जमा केलेले सर्व सायलेन्सर आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी 11 वाजता जमिनीवर अंथरूण त्यावर बुलडोजर फिरवण्यात आले. यामुळे मोठ्या आवाज करणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे.
त्याचबरोबर अंबाजोगाई शहरात शाळा व ट्युशन साठी अल्पवयीन मुले मुली ज्या गाड्या चालवतात त्यांच्यावरही वाहतूक पोलिसांची बारीक नजर असणार आहे त्यांच्याकडून अपघात घडला तर त्यांच्या पालकांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे स्पष्टपणे सुचित करण्यात आले
अंबाजोगाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली
सकाळी झालेल्या कारवाईत ए पीआय कांबळे, वाहतूक पोलीस मधुकर रोडे, पीडी फड, बाळासाहेब पारवे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर,दत्तात्रे इंगळे, कृष्णा वडकर आदी कर्मचारी उपस्थित होते
