आंबेजोगाई येथील देशमुख लोमटे इनामदार यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश,,,!
*अंबाजोगाईतील देशमुख, लोमटे, इनामदार यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश*
*अंबाजोगाई (प्रतिनिधी)*
अंबाजोगाई शहरातील खडकपुरा येथील अविनाश लोमटे,राजाभाऊ देशमुख तसेच फ्लॉवर्स क्वार्टर येथील मोहम्मद शफाउद्दीन इनामदार यांनी अंबाजोगाई तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असेफोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
सर्वसामान्य घरातील युवक अभिजीत लोमटे हे काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळताच अंबाजोगाई शहर व तालुक्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे त्यामुळे युवक वर्ग मोठया प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे वळताना दिसत आहे. अविनाश लोमटे, राजाभाऊ देशमूख, इनामदार हे सातत्याने सामाजिक चळवळीत पुढे असतात अद्याप पर्यंत कोणत्याही पक्षाशी निगडित नसलेले हे युवक लोमटे खतीब प्रामुख्याने काँग्रेस ची ताकत वाढवण्यासाठी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे
