महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा तुघलकी निर्णय
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा तुघ♦लकी निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आंबेजोगाई शाखेनं केलं आंदोलन
आंबेजोगाई प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजोगाई शाखेने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने 30 जून 2025 रोजी जारी केलेल्या वादग्रस्त अधिसूचनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे या अधिसूचनेनुसार केवळ एका वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याच्या परवानगी सोबतच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदणी पुस्तकांमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचा व नैतिकतेचा अवमान करणारा असून रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण करणार आहे या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी आय एम ए आंबजोगाई शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले .
या शिष्ट मंडळात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले आंबेजोगाई शाखेचे डॉक्टर नवनाथ घुगे अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे सचिव डॉक्टर राहुल धाकडे उपाध्यक्ष डॉक्टर विजय लाड उपाध्यक्ष डॉक्टर नितीन तोष्णीवाल सहसचिव डॉ अतुल शिंदे सहसचिव डॉक्टर बळीराम मुंडे सह कोषाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव सांस्कृतिक सचिव डॉक्टर शिवराज पेस्टे क्रीडा सचिव डॉक्टर संदीप जोगदंड क्रीडा सहसचिव डॉक्टर अनिल भुतडा डॉक्टर सचिन पोतदार डॉक्टर विवेक मुळे डॉक्टर नागरगोजे नागोराव देणारे यांची प्रमुख उपस्थिती होती इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजोगाई च्या शाखेने यावेळी नागरिकांमध्ये या निर्णयामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात कसे येईल याविषयी जनजागृती केली यामध्ये या अधिसूचनेचे दुष्परिणाम स्पष्ट करून शासनाला या निर्णयाविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .
