धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग वाढ मंजूर,,,,!
माननीय माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब तसेच माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, सरपंच सौ गोदावरी राजाराम मुंडे, शाळेचे मुख्याध्यापक शाम आघाव सर, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने व गावातील पालक व पाल्य यांच्या इच्छाशक्तीमुळे जिल्हा परिषद शाळेला इयत्ता आठवी वर्गाची मान्यता मिळाली आहे सर्वांचे अभिनंदन होताना दिसत आहे.
महाराष्ट्र शासन जिल्हा बीड प्राथमिक शिक्षक विभागाकडून, पंचायत समिती सर्व निकषात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग वाढ मंजूर केल्या आहेत. शिक्षण ,शिक्षणाचा अधिकार अन्वये, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये या अधिकारानुसार निकषात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेंना वर्ग वाढ मंजूर केल्या आहेत.
