आय एम ए अंबाजोगाई व रोटरीच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद
*अंबाजोगाई -: प्रतिनिधी*
रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संवाद दृढ व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या आयएमए संघटना शाखा अंबाजोगाई व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या पुढाकाराने डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात २६ जणांचे रक्तदान करण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, जीवनदायी ब्लड बँक,भुतडा हॉस्पिटल, अंबाजोगाई क्लिनिकल लॅब संघटना , रोट्रॅक्ट क्लब अंबाजोगाई, विनोद भैय्या पोखरकर मित्रमंडळ यांच्या वतीने डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा( काकाजी) , आय.एम.ए चे सांस्कृतिक विभागाचे चेयरमन डॉ.राजेश इंगोले, दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते,आय.एम.ए. अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे,सचिव डॉ.उद्धव शिंदे,रोटरीच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक,सचिव मंजुषा जोशी,डॉ.अनिल भुतडा,डॉ. सौ.मनिषा भुतडा, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.सचिन पोतदार,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.या माध्यमातून समाजाशी आय एम ए अंबाजोगाई हे संघटना सातत्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा यासाठी काम करते आहे. शिवाय वैद्यकीय सेवा करत करत सामाजिक कार्यात सुद्धा ही संघटना कार्यरत आहे. सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासारखे आयोजन या ठिकाणी केले जाते आहे ही अभिनंदन व कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत रक्ताने नाते जोडण्याची किमया साध्य होते, असे मुंदडा यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी डॉ.इंगोले , श्री परमेश्वर गित्ते यांनी रक्तदान करण्याचे महत्व तसेच आय एम ए, रोटरी च्या कार्याबद्दल विस्तृत मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी भूतडा हॉस्पिटल च्या वर्धापन दिनानिमित्त नंदकिशोर जी मुंदडा ( काकाजी ) यांच्या हस्ते डॉ अनिल भूतडा व डॉ मनीषा भूतडा यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी डॉ.नवनाथ घुगे यांनी या रक्तदान शिबिराच्या आयोजनाची भूमिका सांगितली. संपूर्ण भारतामध्ये आयएमए संघटना कार्यरत असून त्याचे जाळे विस्तारलेले आहे. अंबाजोगाई शहरांमध्ये आयएमएच्या माध्यमातून वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात, ज्याचा लाभ सामान्य व गोरगरीब रुग्णांना होत असतो. आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि माणूस म्हणून काम करण्याची तयारी संपूर्ण डॉक्टरांनी जपलेली आणि जोपासलेली आहे. सामाजिक कार्य करत असताना समाज सुद्धा तेवढीच मदत आणि सहकार्य आम्हाला करत असतो. काम करत असताना त्यासाठी सहकार्याचे हात पाठीशी असावे लागतात आमच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वर्षभर आम्ही जे काम करतो त्या कामाची पावती म्हणून डॉक्टर्स डे च्या निमित्ताने सामाजिक कृतज्ञता म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. या माध्यमातून हे रक्त कुठल्या ना कुठल्या गंभीर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कामी यावे ही या मागची भूमिका असल्याचे डॉ. घुगे यांनी सांगितले. वर्षभरातील एकूण कामाचा आढावा डॉ.नवनाथ घुगे यांनी घेतला. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात २६ जणांनी रक्तदान केले.
या प्रसंगी ज्येष्ठ डॉ.एन.पी.देशपांडे,डॉ.ज्योती देशपांडे, डॉ शुभदा लोहिया, डॉ संदीप थोरात, डॉ अनिल भूतडा, डॉ मनीषा भूतडा, डॉ.दीपक लामतुरे, डॉ प्रल्हाद गुरव, आय एम ए चे उपाध्यक्ष डॉ विजय लाड, सचिव डॉ उद्धव शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ सचिन पोतदार, डॉ बळीराम मुंडे, डॉ.अतुल शिंदे, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ.मनिषा पवार, डॉ.प्रसाद कुलकर्णी, डॉ.विनोद जोशी, डॉ सुनील जाधव, डॉ दीपक पाटील, डॉ अमोल दहिफळे, डॉ विजय निकम, डॉ श्रीनिवास लांब, सौ संगीता नावंदर, रोटरी क्लबचे रो कल्याण काळे, रो धनराज सोळंकी, रो रमेश देशमुख, रो भीमाशंकर शिंदे, रो बालाजी घाडगे, रो जगदीश जाजू, रो गोरख बापू मुंडे, रोट्रॅक्ट क्लब च्या नूतन अध्यक्ष विशाखा बजाज, सचिव मयूर परदेशी, सर्वेश बजाज, रो मंदाकिनी गित्ते, श्री विनोद भैय्या पोखरकर, सचिन गौरशेटे, जीवनदायी ब्लड लॅबचे सूर्यकांत आघाव यांची उपस्थिती होती. आय एम ए चे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांनी रक्तदान करून सुरुवात केली तर रमेश देशमुख,रोहिणी पाठक ,मंदाकिनी गीते,राधेश्याम लोहिया ,बालाजी घाडगे,भीमाशंकर शिंदे,विनोद पोखरकर,संगीता नावंदर,
डॉ.मनिषा भुतडा, प्रकाश बोरगावकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यातील काही जणांनी 72 वेळा तर काही जणांनी 28 वेळा रक्तदान करून विक्रम केला आहे.त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
